esakal | ऊसतोड मजुरांच्या त्या पत्राची धनंजय मुंडेंकडून दखल; आर्थिक, सामाजिक स्थैर्य मिळवून देण्याचा दिला शद्ब
sakal

बोलून बातमी शोधा

1Dhananjay_Munde_0

नुकतेच ‘चला हवा येऊ द्या’ या मराठी विनोदी मालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावली होती.

ऊसतोड मजुरांच्या त्या पत्राची धनंजय मुंडेंकडून दखल; आर्थिक, सामाजिक स्थैर्य मिळवून देण्याचा दिला शद्ब

sakal_logo
By
ई सकाळ टीम

औरंगाबाद : नुकतेच ‘चला हवा येऊ द्या’ या मराठी विनोदी मालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावली होती. या प्रसंगी मराठवाडा व नगर या भागातील ऊसतोड मजूरांच्या प्रश्‍नांवर अरविंद जगताप यांनी लिहिलेले पत्र सागर कारंडे यांनी वाचून दाखवले. हे पत्र राज्यात गाजले. त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्र अरविंद जगताप यांनी लिहिले आहे. पत्रात मुंडे म्हणतात, की ऊसतोड कामगारांच्या संदर्भातील पत्र वाचून अंगावर काटा आला. माझे वडीलही ऊसतोड कामगार होते.

काबाडकष्ट करणाऱ्या ऊसतोड कामगारांना त्यांच्या लेकरांच्या नशिबी हीच पाचाट आणि कोयता द्यावा लागतो. त्यांचे हेच भविष्य सुधारण्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभारलेल्या महामंडळ आपल्या खात्यात मागून घेतल्याचे ते पत्रात सांगतात. पुढे मुंडे लिहितात, की राबणाऱ्या आपल्या आया, बहिणींसाठी एक विशेष साहाय्य योजना आखायची आहे. या कामगारांना हक्काच काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेसारखी काम हाती घेण्याचा प्रयत्न आहे.

या सर्व कामगारांच्या सुरक्षा आणि लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी मी शद्बबद्ध आहे, असा शद्ब मुंडे यांनी दिला आहे. ऊसतोड कामगारांसाठी घेत असलेल्या प्रयत्नांची दखल अरविंद जगताप यांनी घेऊन एक पत्र भविष्यात लिहावे अशी अपेक्षा त्यांनी पत्राच्या शेवटी व्यक्त केली आहे.  

संपादन - गणेश पिटेकर

go to top