मद्याच्या महसुलात 1200 कोटींची घट, आठ महिन्यांत 1837 कोटींचा महसूल

प्रकाश बनकर 
Monday, 28 December 2020

मागील आठ महिन्यांत केवळ १ हजार ८३७ कोटी ८१ लाख ३८ हजार ४०४ रुपयांचा महसूल मिळाला आहे.

औरंगाबाद : कोरोनाचा सर्वच क्षेत्रांवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. यातून औद्योगिक क्षेत्र पूर्वपदावर येत आहेत. मात्र राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या मद्य उद्योगावर कोरोनाचा मोठा परिणाम जाणवला आहे. गेल्या वर्षी औरंगाबादेतील मद्य कंपन्या आणि मद्य विक्रीतून राज्य उत्पादन शुल्क विभागाल ३ हजार ५६ कोटींचा महसुल मिळाला होता. यंदाच्या महसुलात १ हजार २१८ कोटी २३ लाख ६८ हजार १४३ रुपयांची घट झाली आहे. 

मागील आठ महिन्यांत केवळ १ हजार ८३७ कोटी ८१ लाख ३८ हजार ४०४ रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यामुळे यावर्षी ४० टक्क्यापर्यंत मोठी तुट निर्माण झाली आहे. 
कोरोनामुळे मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्या दोन ते तीन महिने बंद होत्या. त्यामुळे कोट्यवधीच्या महसुलावर परिणाम झाला आहे.

नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी, बीड जिल्ह्यातील प्रभारींच्या निवडी घोषित

जून ते जुलै दरम्यान कंपन्यांची उत्पादन सुरु झाले. मात्र तेही अजून पूर्ण क्षमतेने सुरु झाले नाहीत. मद्य विक्रीही सहा महिन्यांहून अधिक काळ बंद होती. ती सुरु झाल्यानंतर महसुलात वाढ झाली आहेत. एप्रिल ते नोव्हेंबर या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाला तब्बल ४० टक्के महसूल कमी मिळाला आहे.

दिवाळीनंतर ख्रिसमस नाताळ, थर्टी फस्टच्या काळात ही तुट भरून निघेल अशी अपेक्षा असताना पुन्हा रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. यामुळे थर्टी फस्टच्या माध्यमातून मिळणारा महसुलावर परिणाम जाणवणार आहेत.

भाजप नेत्याचा भाचा 2 वर्षांसाठी तडीपार; मामा-भाच्यामधील वाद विकोपाला
 
 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनामुळे ४० टक्के महसुलावर परिणाम जाणवला आहेत. कोरोनाचा दुसरा विषाणू येण्याची शक्यता आहे. यामुळे काळजी घेण्याचे सांगण्यात येत आहेत. याचाही परिणामाची शक्यता राहील. 
-सुधाकर कदम, अधीक्षक,राज्य उत्पादक शुल्क. 

 

(edited by- pramod sarawale) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1200 crore reduction in alcohol revenue