रब्बीसाठी जिल्ह्यात एवढे टक्‍के पीककर्जाचे वाटप

प्रकाश बनकर
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

रब्बी हंगामासाठी 1 ऑक्‍टोबरपासून जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची प्रक्रिया राबविली जात आहे. सुरवातीपासूनच पीककर्ज वाटपाची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षासाठी रब्बीसाठी 181 कोटी 43 लाखांचे उद्दिष्ट बॅंकांना देण्यात आले होते. यातील तीन महिन्यांत दिलेल्या उद्दिष्टापैकी अवघे 9.88 टक्केच पीककर्ज वाटप झाले.

औरंगाबाद: शेतकऱ्यांना सातत्याने आसमानी व सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीककर्ज हा मोठा आधार ठरतो. परंतु बॅंकाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना पीककर्जापासून वंचित राहावे लागते. यंदाच्या रब्बी हंगामासाठी बॅंकांना दिलेल्या उद्दिष्टापैकी अवघे 9.88 टक्केच पीककर्ज वाटप झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

रब्बी हंगामासाठी 1 ऑक्‍टोबरपासून जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची प्रक्रिया राबविली जात आहे. सुरवातीपासूनच पीककर्ज वाटपाची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षासाठी रब्बीसाठी 181 कोटी 43 लाखांचे उद्दिष्ट बॅंकांना देण्यात आले होते. यातील तीन महिन्यांत दिलेल्या उद्दिष्टापैकी अवघे 9.88 टक्केच पीककर्ज वाटप झाले.

हेही वाचा : औरंगाबादचे झाले काश्‍मीर  

व्यापारी बॅंकांकडून सर्वाधिक कर्जवाटप

जिल्ह्यातील 5 हजार 933 शेतकऱ्यांनाच बॅंकांनी पीककर्ज दिले. यामध्ये सर्वाधिक कर्जवाटप व्यापारी बॅंकांकडून करण्यात आले. व्यापारी बॅंकांनी 4,830 शेतकऱ्यांना 46 कोटी 47 लाख कर्जवाटप केले. शेतकऱ्यांची बॅंक म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा बॅंकेने सर्वात कमी अवघ्या 493 शेतकऱ्यांना 70 लाख 11 हजार रुपयांचे (0.39 टक्के) कर्ज वितरित करण्यात समर्थता दर्शविली. 

क्‍लिक करा : ऑनलाईन नोकरीच्या अमिषाने गंडा 

पेरणीचे संकट उभे राहिले.

मागील वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातीच काहीच उरले नाही. यंदा अवकाळी पावसामुळे खरीप हंगामात हाती आलेले पीक वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांकडे रब्बी हंगामात पेरणीसाठी पैसाच उरला नसल्याने पेरणीचे संकट उभे राहिले. अवकाळी पाऊस आणि खरिपासाठी वाटप झालेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने बॅंकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास नकार दिला. परिणामी रब्बीच्या पीककर्ज वाटपावर परिणाम झाला आहे. बहुतांश बॅंकांनी कर्जवाटप प्रक्रिया थांबविल्याने अत्यल्प कर्जवाटप झाले आहे. 

हेही वाचा : video - इथे प्या एक रुपयात एक घोट चहा  

कर्जमाफी मूळे नवे कर्ज घेण्यास शेतकऱ्यांची ना-ना 
परतीच्या पावसामूळे झालेले नुकसानामूळे खरीपाचे पिक वाया गेले. खरीपासाठी काढलेले पिक कर्जांचे पैस कुठुन फेडायचे हाच प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. यात नुकसानीचे आठ हजारही बहुतांश शेतकऱ्यांचा खात्यात जमा झालेले नाही. आता रब्बीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाही. अशातच नवे कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्या उत्साही नाही. आधि कर्जमाफीची रक्‍कम शेतकऱ्यांना मिळाल्यावर शेतकरी नवीन कर्ज घेणार आहे. महाआघाडी सरकारने 2 लाख रूपयापर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. याची प्रक्रीया आद्यापही सुरु झालेली नाही. त्यामूळे काही शेतकऱ्यांना रब्बीसाठी कर्ज पाहिजेत आहेत. कर्जमाफीच्या प्रक्रीयाबरोबर नवीन कर्ज मिळेल अशी शेतकऱ्यांना अशा आहे.

येथे क्‍लिक करा : समृद्धीच्या कामाचा असाही साईड इफेक्‍ट     

बॅंक शेतकरी कर्जवाटप टक्केवारी
जिल्हा बॅंक 493 70.11 लाख 0.39 
व्यापारी बॅंका 4830 46.47 लाख 15.68
ग्रामीण बॅंक 610 5.8 लाख 9.98 
एकूण 5,933 5 कोटी 21 लाख  9.88 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of crop loan for Rabbi in the district Rabbi Season