औरंगाबादचे झाले काश्‍मीर-आसाम; मोबाईल, इंटरनेट सेवा ठप्प 

माधव इतबारे
सोमवार, 16 डिसेंबर 2019

औरंगाबाद शहरात चार दिवसांपासून मोबाईल आणि इंटरनेट सेवा ठप्प पडली आहे. कुणी आणि का केली आहे ही कारवाई? कुणाला लगाम लावण्यासाठी बंद पाडली जात आहे मोबाईल सेवा? 

औरंगाबाद : कुठलाही दंगाधोपा नाही, कर्फ्यू लागलेला नाही, सामाजिक वातावरण बिघडलेले नाही. पण तरीही औरंगाबाद शहरात चार दिवसांपासून मोबाईल आणि इंटरनेट सेवा ठप्प पडली आहे. कुणी आणि का केली आहे ही कारवाई? कुणाला लगाम लावण्यासाठी बंद पाडली जात आहे मोबाईल सेवा? 

क्‍लिक करा : माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

औरंगाबाद महापालिकेचे नवे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी ही कारवाई सुरू केली आहे. चार दिवसांपासून मोबाईल कंपन्यांविरुद्ध सुरू असलेल्या या कारवाईचा कळीचा मुद्दा आहे, तो अनधिकृत मोबाईल टॉवर्स. मोबाईल कंपन्यांच्या शहरातील शेकडो टॉवर्सचा कोट्यवधी रुपयांचा कर थकीत असल्याने महापालिकेने शुक्रवारपासून (ता. 13) टॉवर सील करण्याची मोहीम सुरू केली आहे. शुक्रवार व शनिवार (ता. 14) दोन दिवसांत दीडशे टॉवर सील करण्यात आले. आता हा आकडा सोमवारी (ता. 16) 300च्या वर गेला आहे. या टॉवर्सना सील केल्यामुळे त्यांच्या प्रभावक्षेत्रातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. 

हेही वाचा : video : अरेच्चा ! कोंबडीशिवाय जन्मतात पिले ! 

औरंगाबादेत बेकायदा मोबाईल टॉवरचे पेव फुटले आहे. शहरात एकूण 561 मोबाईल टॉवर्स असून, यातील केवळ 61 टॉवर्सकडेच परवानगी आहे, असे महापालिकेचे म्हणणे आहे. बेकायदा टॉवरला महापालिकेने दुप्पट मालमत्ता कर लावलेला आहे. याविरोधात कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, थकबाकीचा आकडा तीस कोटींवर गेल्याने महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी या कराच्या वसुलीसाठी मोबाईल टॉवर सील करण्याचे आदेश दिले होते. 

उघडून तर बघा - पंकजा मुंडे करणार औरंगाबादला उपोषण, पण कधी? 

मालमत्ता करसंकलन व निर्धारण विभागाने शुक्रवारी सायंकाळी टॉवर सील करण्याची मोहीम सुरू केली. सायंकाळपर्यंत पंधरा टॉवर सील करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. शनिवारीही दिवसभर वेगवेगळ्या भागात मोबाईल टॉवर सील करण्यात आले. चार दिवसांत सुमारे 300 मोबाईल टॉवर सील करण्यात आल्याचे मुख्य करसंकलक करणकुमार चव्हाण यांनी सांगितले. जिओ, बीएसएनएल कंपनीचे टॉवर कारवाईतून वगळण्यात आले आहेत. 

अरे बाप रे - माजलगावात द बर्निंग ट्रक, अचानक घेतला पेट

जिओ कंपनीचे 90 आणि बीएसएनएलचे 51 टॉवर आहेत. जिओ कंपनीने कराची रक्कम भरली आहे, तर बीएसएनएलच्या कार्यालयाने ही रक्कम भरण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे त्यांना वगळण्यात आले. कारवाईची मोहीम सुरूच राहणार असून, आणखी सुमारे 200 मोबाईल टॉवर्सवर कारवाई होणार आहे.

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile Internet Services Suspended in Aurangabad