esakal | बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बाप-लेकाचे खरे मारेकरी वनविभागाचे अधिकारीच! पैठणमधील थरार!   
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्या.jpg

निगरगठ्ठ अधिकारी तर बिबट्याचा फोटो पाठवा, मग कर्मचारी पाठवू अशी भूमिका घेताना दिसतात. त्यांच्या या असंवेदनशीलतेने आज बाप लेकाचा मृत्यू झाला. मुळात बिवट्याने जरी हल्ला केला असला तरी बाप लेकाचे खरे मारेकरी तर वनविभागाच आहे, अशी भूमिका संतप्त झालेल्या नागरिकांनी मांडली आहे. 

बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बाप-लेकाचे खरे मारेकरी वनविभागाचे अधिकारीच! पैठणमधील थरार!   

sakal_logo
By
हबीबखान पठाण

आठ दिवसांपासून दै. सकाळच्या वतीने पैठण व पाचोड तालूक्यात बिबट्याचा शिरकाव झाला आला असल्याचे वृत्त प्रकाशित केले. तरी देखील वनविभागाच्या निगरगठ्ठ अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वेळोवेळी माहिती देऊन, गावा-गावातील नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर देखील ते जागे झालेच नाही. सोमवारी पैठण तालूक्यातील आपेगाव शिवारात बाप-लेकाचा मत्यू झाल्यावर वनविभागाला कशी जाग आली. त्यात काही निगरगठ्ठ अधिकारी तर बिबट्याचा फोटो पाठवा, मग कर्मचारी पाठवू अशी भूमिका घेताना दिसतात. त्यांच्या या असंवेदनशीलतेने आज बाप लेकाचा मृत्यू झाला. मुळात बिवट्याने जरी हल्ला केला असला तरी बाप लेकाचे खरे मारेकरी तर वनविभागाच आहे, अशी भूमिका संतप्त झालेल्या नागरिकांनी मांडली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पाचोड (औरंगाबाद) : गेल्या आठ दिवसांपासून बिबट्या आल्याच्या चर्चेने सर्वत्र दहशत पसरुन शेत शिवार ओस पडले. शेतावर कामासाठी गेलेल्या माहिला बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतातील कामे अर्धवट सोडून गावांकडे परतल्या. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात कामे करण्यास कुणीही धाडस करेना. ऐन शेतकामाच्या लगबगीच्या दिवसांत शेतीकामे खोळंबली. बिबटया पकडण्यासाठी नागरिक वन विभागास आर्त हाक देताहेत, परंतु कुंभकर्ण निद्रेत असलेले वनविभाग बिबटया दिसल्याचा पुरावा म्हणून छायाचित्र द्या, तेव्हा कारवाई करतो म्हणून सांगतात. या वनविभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे सोमवारी (ता. १६) रात्री आपेगाव (ता. पैठण) शिवारात पितापुत्र बिबटयाच्या हल्ल्यात बळी पडले, अन् वनविभागासह सर्वच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.

दै. सकाळ' ने सलग तीन दिवस बिबटया नागरिकांना दिसतो. मात्र वन विभागाला नाही, बिबट्याच्या दहशतीने शेत शिवार ओस पडल्याचे वृत्त प्रकाशित केले. मात्र त्यांची कुंभकर्णी झोप दोन बळी गेल्यानंतर जागी झाल्याने तालुकाभर त्यांच्याविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

आठ दिवसापासून पाचोड (ता.पैठण) सह रांजनगाव दांडगा, कोळी बोडखा, खादगाव, सोनवाडी, थेरगाव, मुरमा, लिंबगाव, वडजी, सालवडगाव, देवगाव परिसरात बिबटया नजरेस पडल्याचे पाहावयास मिळाले. यासंबंधी बिबट्याचे दर्शन झाल्याची बातमी पसरताच वनविभागाच्या केवळ दोन कर्मचाऱ्यांनी परिसरात धाव घेऊन बिबटयाच्या ठशाची पाहणी करून वरिष्ठांना अहवाल देतो म्हणून बोळवण केली. सर्वत्र गावागावांत ग्रामस्थ  जागता पहारा देतांना पाहवयास मिळाले. मात्र वनविभाग कुंभकर्ण निद्रेत राहीला त्याने फारसे गांभीर्याने घेतले नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दहा दिवसापूर्वी पाचोड पासून दहा किलोमिटर अंतरा वरील जामखेड शिवारात बिबट्याने महिलेवर केलेल्या हल्ल्यात महीला ठार झाल्याने सर्वत्र बिबट्याची दहशत पसरली. या घटनेनंतर रविवारी (ता. आठ) डोणगाव शिवारात बिबट्या शेतमजूराच्या दृष्टीस पडला. तर मगंळवारी (ता.दहा) केकत जळगाव, सोनवाडी, खादगाव शिवारात रात्री नागरिकांनी बिबटया पाहीला. बुधवारी (ता.११) सकाळी रांजनगाव (दांडगा) शिवारात बिबट्या दोन बछड्यांसोबत मुक्त संचार करतांना कापुस वेचऱ्या मजुरांना दिसला. शुक्रवारी (ता.१३) लिंबगाव व पाचोड परिसरात कापूस वेचणी करताना बिबटया दोन बछडया सह दृष्टीस पडल्याने दोन महीला घाबरून जमिनीवर पडल्या. शनिवारी (ता.१४) रात्री थेरगाव येथे गावांलगत बिबट्या दिसून आला. रविवारी (ता. १५) सोमवारी (ता. १६) दुपारपर्यंत सालवडगाव शिवारात बिबटयाचा मुक्काम होता. त्याचे दर्शन होताच शेतमजूर भितीपोटी दुपारीच घरी परतल्याने सर्व कामे खोळंबली. ही बातमी काही वेळातच हवेसारखी परिसरात पसरली. अन् शेतातील चालु कामे सोडून मजूरांनी गावांकडे धाव घेतली. नागरिकांनी परमेश्वर वाकडे यांच्या शेतात बिबटया असल्याने शेताला घेराव घातला. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वनविभागाचे अधिकारी म्हणतात, हे रोजचेच 
बिबटया असल्याची माहीती वनपरिक्षेत्र अधिकारी शशिकांत तांबे यांना देण्यात आली. त्यांनी हे रोजचेच आहे, आता बिबटया असल्याचा फोटो पाठवा, खात्री झाल्यावर कारवाई करू म्हणून वेळ मारून नेत केवळ दोन कर्मचाऱ्यांना पाठवले. नागरिकांनी बिबटया सोबत फोटो घ्यायचा कसा? असा प्रश्न नागरिकांना पडला. हल्ल्याच्या भीतीने नागरिकाना एकट्याने घराबाहेर पडणे कठीण झाले. गंगथडी भागातील गावात बिबट्या असल्याच्या बातम्यांस अन्य गावातील चर्चेतून बळ मिळाले असले तरी आता दोघांचा बळी गेल्यानंतर खात्रीही पटली आहे. वनविभागाचे कर्मचारी केवळ आपल्या पथकासह सदरील गावांस भेट देऊन बिबट्याच्या पाऊलखूणा (ठसे) शोधण्याचा प्रयत्न करून नागरिकांची समज काढतात, तर वरिष्ठ अधिकारी वातानुकूलित कक्षेत बसून केवळ उंटावरून शेळ्या हाकतात. 

२०१८ ला गोपेवाडी शिवारात बिबटयाचा हल्ला

यापूर्वी सन २०१८ मध्ये गोपेवाडी शिवारात बिबटयाच्या हल्ल्यात भरत मुरलीधर ठाणगे ठार झाले होते. तर १२ एप्रिल रोजी थेरगाव येथे बिबटयाला ग्रामस्थांनी पहाटे साडेपाच वाजेपासून एका मक्याच्या पिकांत थोपवून ठेवत वन अधिकाऱ्याला कल्पना दिली. पोलीस, महसूल अधिकारी आठ वाजता तेथे आले होते तर वन विभागाचे अधिकारी तब्बल आठ तासाने दुपारी दोन वाजता आले. ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने तेव्हा बिबटया पैठणच्या इतिहासात प्रथमतः जेरबंद झाला होता. 


नागरीक म्हणतात अधिकाऱ्यांवर कारवाई करा

वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आपेगाव येथील बाप - लेकाचा बळी गेला. गेल्या आठ दिवसापासून सर्वत्र वर्तमानपत्रांमध्ये "बिबट्या शेतकऱ्यांना दिसतोय .....मात्र वन विभागाला दिसेना" म्हणून वृत प्रसिद्ध होऊन देखील वन विभागाने याकडे सहजपणे दुर्लक्ष केले. यामुळे ही दुर्घटना घडली.  संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनीकामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी ग्रामस्थ धनराज भुमरे यांनी केली आहे. 
सालवडगाव, रांजनगाव, लिंबगाव, खादगाव, थेरगाव, खंडाळा, कुतूबखेडा शिवारातच असण्याची शाश्वती असून वन विभागाने तातडीने या बिबट्याचा शोध घेण्याची तसदी घ्यावी, केवळ उटावरुन शेळ्या हाकू नयेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शामदादा तांगडे, राजेंद वाघमोडे, बी. टी. तांगडे, एजाज पटेल, रेवन कर्डिले, अनिल हजारे, नवनाथ हजारे, माजी सरपंच आजिज पटेल यांनी केली.

काय म्हणतात अधिकारी 

यासंबधी वनपरिक्षेत्र आधिकारी शशीकांत तांबे म्हणाले,  बिबट्याच्या दररोजच अफवा येत आहे, ज्याला बिबटया दिसेल त्याने त्याचा फोटो घेऊन आम्हाला पाठवावा, नंतर आम्ही कारवाई करू.

वनमंडळ अधिकारी मनोज कांबळे म्हणाले ' बिबटया दिसला की त्याचे किंवा त्याच्या पायाच्या ठशाचे ठेवून फोटो घ्या, आम्ही स्वतः बिबटया पाहीला तरी आम्हाला नागपूरहुन परवानगी मिळाल्याशिवाय काही करता येत नाही. 

(संपादन-प्रताप अवचार)