डीएलएड प्रवेशाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर!

संदीप लांडगे  
Monday, 30 November 2020

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत असलेल्या डीएलएड प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया देखील रखडली होती. ती देखील सुरु झाली असून, आज सोमवार दि. ३० नोव्हेंबर रोजी तात्पूर्ती अंतिम गुणवत्ता यादी जाहिर करण्यात येणार आहे. तसेच परिषदेने प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहिर केले आहे. अशी माहिती प्रवेश संनियंत्रण समितीने दिली आहे. 

औरंगाबाद : मराठा आराक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया रखडल्या होत्या. परंतु शासनाने नियमांच्या अधिन राहून प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात मंजूरी दिल्याने या प्रवेश प्रक्रियांचा मार्ग मोकळा झाला आहेत. त्यात राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत असलेल्या डीएलएड प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया देखील रखडली होती. ती देखील सुरु झाली असून, आज सोमवार दि. ३० नोव्हेंबर रोजी तात्पूर्ती अंतिम गुणवत्ता यादी जाहिर करण्यात येणार आहे. तसेच परिषदेने प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहिर केले आहे. अशी माहिती प्रवेश संनियंत्रण समितीने दिली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
देशभरात करोनो विषाणूचा वाढता प्रादुर्भाव यामुळे अधिकच शैक्षणिक सत्र यंदा लांबणीवर पडले आहे. तर नंतर मराठा आरक्षणामुळे प्रवेश प्रक्रिया थांबली होती. नियमांच्या अधिन राहून सुरु झालेल्या प्रक्रियेत आता सोमवारी सकाळी १० वाजता तात्पूरती गुणवत्ता यादी जाहिर करण्यात येईल. याच दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांनी त्यांना आक्षेप असल्यास ते ऑनलाइन पुराव्या दाखल अपलोड करायचे आहेत. तर पडताळणी अधिकाऱ्यांनी आक्षेबाबतची खात्री करुन योग्य असल्यास ऑनलाइन दुरुस्ती सुचवायची आहे. दुरुस्तीबाबत पडताळणी करतांना दुरुस्ती फक्त अप्रुव्ह केलेल्या माहितीमध्येच करता येईल याची नोंद उमेदवारांनी घ्याची आहे. तसेच नव्याने कोणतेही प्रमाणपत्र स्वीकारले जाणार नाही याची दक्षता देखील घ्यायची आहे. योग्य असणारे आक्षेप आणि त्यासंदर्भात पडताळणी केलेल्या दुरुस्त्यांची माहिती पडताळणी अधिकाऱ्यांनी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत त्यांच्या लाॅगइनमधून ऑनलाइन पद्धतीने ओके करावी. त्यानंतर आलेल्या दुरुस्त्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत असेही समितीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

असे आहे वेळापत्रक - 

  • - १ डिसेंबर रोजी पूर्ण भरलेल्या अर्जांची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहिर होईल. 
  • - प्रवेशाची पहिली यादी २ डिसेंबर रोजी जाहिर होईल. या फेरीतील उमदेवारांनी ५ डिसेंबर पर्यंत प्रवेश निश्चित करायचे आहेत. 
  • - दुसऱ्या फेरीसाठी ७ डिसेंबर रोजी जाहिर होईल. या फेरीतील उमेदवारांना १० डिसेंबर पर्यंत प्रवेश निश्चित करता येतील. 
  • - ११ डिसेंबर रोजी तिसऱ्या फेरीसाठी विकल्प अर्ज भरता येईल. तर १२ डिसेंबर रोजी अंतिम आणि तिसऱ्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी जाहिर होईल. हे प्रवेश १६ डिसेंबर पर्यंत निश्चित करायवे लागतील. 
  • - १७ डिसेंबर रोजी डाएट प्राचार्यांनी जिल्हयातील अध्यापक विद्यालय निहाय झालेल्या प्रवेशाची खात्री करुन घ्याची आहे. तर १५ डिसेंबर पासून प्रथम वर्ष शैक्षणिक सत्रास सुरुवात करायची आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DLED admissions revised schedule announced