औरंगाबादमधील या गावात दाऊदने घेतला होता प्लॉट, काय झाले त्याचे?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण औद्योगिक वसाहतीतही त्याने ६०० चौरस मीटर एक भूखंड घेऊन ठेवला होता.

औरंगाबाद : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे कोरोनामुळे निधन झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे दाऊद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दाऊदची जगभर संपत्ती आहे. दरम्यान, भारतातही त्याने अब्जावधी रुपये रियल इस्टेटमध्ये गुंतवले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण औद्योगिक वसाहतीतही त्याने ६०० चौरस मीटर एक भूखंड घेऊन ठेवला होता. या जागेचा ताबा केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाकडे होता. १४ नोव्हेंबर २०१७ ला त्याचा ई-लिलाव लिलाव करण्यात आला.   

दाऊद आणि त्याच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या मालमत्ता सरकारने दोन-तीन वर्षांपूर्वी लिलावात काढल्या. मुंबईच्या मालमत्तांसह पैठण येथील औद्योगिक वसाहतीतील एका भूखंडाचा या लिलाव प्रक्रियेत समावेश होता. पैठण औद्योगिक वसाहतीत असलेल्या ए-४९ या भूखंडाचा लिलाव करून त्याची रक्कम सरकारदरबारी जमा केली. औद्योगिक कारणासाठी घेतलेल्या या भूखंडावर दाऊदने कोणताही उद्योग सुरू केला नाही. केवळ त्या ठिकाणी चार ते पाच फूट उंचीचे बांधकाम केले होते. दरम्यान, इमारत पूर्णत्वाचे प्रमाणपत्रही (सीसी) त्याने घेतलेले नव्हते. या भूखंडासाठी लिलावासाठीची किमान किंमत एक लाख दोन हजार रुपये ठेवण्यात आली होती.  
 
सध्या दाऊद चर्चेत का?
दाऊद इब्राहिमचे कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी आहे. दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानातील कराचीमधील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आता या रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. वर्ष १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या सीरियल बॉम्ब स्फोट प्रकरणी दाऊद इब्राहिम गेल्या अनेक वर्षांपासून फरार आहे. त्यानंतर दोन दिवसांपासून दाऊद इब्राहिम आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त येत होते.

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  

पण, दाऊदचा भाऊ अनीस याने दाऊद आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. तसेच अनिसने दाऊद किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे सांगितले. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाइटने दिले आहे.

दाऊदला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. याशिवाय त्याच्यावर कराचीतील रुग्णालयात सध्या कोरोनावर उपचार केले जात आहेत. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 
 
अधिकृत माहिती नाहीच 
दाऊदच्या मृत्यूची बातमी न्यूज एक्सच्या सूत्रांच्या माहितीनुसार दिली आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. बाबत अनिस इब्राहिमने सांगितले की, 'दाऊदच्या कुटुंबातील सर्वजण सुरक्षित असून, कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. सर्वजण घरात सुरक्षित आहेत. आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम याने एका अज्ञात ठिकाणाहून फोनवरून सांगितले, की आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य ठिक आहेत. कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. अनिस सध्या यूएईमध्ये आलिशान हॉटेल आणि पाकिस्तानात मोठा कंस्ट्रक्शन प्रोजेक्टसह ट्रान्सपोर्ट व्यवसाय चालवतो.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don Dawoods Property In Aurangabad