औरंगाबादेतील बाजारपेठेवर आता ड्रोनची नजर

file photo
file photo
Updated on

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबावा म्‍हणून आता बाजार समिती असो किंवा शहागंजातील फळबाजार यावर नियंत्रण व टेहळणी करण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. फळ व भाजीपाला मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी काही केल्या कमी होत नसल्याचे पाहणीतून दिसून आले आहे. हजार-पाचशेच्या समूहाने होणारी गर्दी पोलिसांसह महापालिका प्रशासनाची डोकेदुखी ठरली असून, त्यावर आता ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त मीना मकवाना यांनी दिली. 

औरंगाबादेतील बहुतांश भागांमध्ये भाजीपाला व फळ बाजारात गर्दी होत आहे. अक्षय तृतीया आणि रमजानचा महिना सुरू झाल्यामुळे शनिवारी (ता.२५) शहागंजमध्ये फळ खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. दुपारच्या रणरणत्या उन्हातही नागरिक खरेदीसाठी बाहेर पडतच आहेत. औरंगाबादेत दुपारी दीड ते रात्री अकरापर्यंत संचारबंदी असतानाही काही भागांत रस्त्यावरील गर्दी कायम होती. जाधववाडीसह इतरही ठिकाणी महापालिकेच्या मोकळ्या मैदानावर भाजी बाजार भरत आहे. त्याठिकाणी कोरोना विषाणू फैलावणार नाही, याची खबरदारी न घेताच नागरिक विनामास्क येत असल्याचे दिसत आहे. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता ५१ वर पोचली आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दिवसेंदिवस आजाराचा फैलाव होण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे गर्दी रोखण्याचे आव्हान पोलिस व महापालिका प्रशासनापुढे आहे. उपायुक्त मीना मकवाना म्हणाल्या, ‘‘मुंबईतून चांगल्या प्रकारचे ड्रोन मागवण्यात आले आहेत. काही ड्रोन पूर्वीचेच होते; पण नवीन ड्रोनची क्षमता अधिक असल्याने गर्दीच्या ठिकाणी हे ड्रोन फिरवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तावरील पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांची महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांच्या चमूकडून तपासणी करण्यात येत आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचेही स्क्रीनिंग करण्यात आले आहे. संपूर्ण परिसर सॅनिटाईज्ड करण्यात आला आहे. होमिओपॅथी औषधांचा दुसरा डोसही देण्यात आला आहे. पहिला डोस महिन्यापूर्वी देण्यात आला आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचीही विभागाकडून काळजी घेतली जात आहे.’’ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com