टोपे साहेब, इतकी कुठं वाट पाहायला लावतात का राव... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

खुद्द आरोग्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक, म्हणून झाडून सगळे महिला-पुरुष अधिकारी व कर्मचारी आपापली कामं सोडून येऊन बसले होते. पण एक-दोन-तीन तास उलटून गेले, तरी टोपे साहेबांचा पत्ताच नाही.

जालना : आरोग्य व शिक्षण विभागाचा आढावा घेण्यासाठी आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात शनिवारी (ता.15) सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित केली होती. मात्र, तीन तास वाट पाहून आरोग्य मंत्री आलेच नाहीत. 

खुद्द आरोग्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक, म्हणून झाडून सगळे महिला-पुरुष अधिकारी व कर्मचारी आपापली कामं सोडून येऊन बसले होते. पण एक-दोन-तीन तास उलटून गेले, तरी टोपे साहेबांचा पत्ताच नाही. अखेर खुर्चीवर बसून-बसून कंटाळलेले आरोग्य अधिकारी व कर्मचारी सभागृहाच्या बाहेर पडले.

दोन वेळा मुख्यमंत्री राहिले, पण त्यांना मुंबईत घर नव्हते

मंत्री लोकहिताच्या कामात व्यस्त असतात, म्हणून अर्धा -एक तास वाट पाहण्याची सर्वांना सवय लागली आहे. मात्र, स्वतः बैठक बोलावून तीन तास उलटूनही मंत्री येत नसल्याने आरोग्यमंत्र्यांनी वाट पाहण्याची सीमा ओलांडली, अशी कुजबुज बसून -बसून कंटाळलेले अधिकारी कर्मचारी सभागृहात करताना दिसले.

साडे सातशे कोटी खर्चूनही प्रकल्प अर्धवटच

आरोग्य मंत्र्यांनी बैठक बोलावल्याने सकाळी दहा वाजताच सर्व अधिकारी व कर्मचारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात हजर झाले होते. एक नव्हे तर तब्बल तीन तास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोग्य मंत्र्याची वाट पाहिली. त्यानंतरही मंत्री महोदय न आल्याने बैठक बारळगली असे समजून अधिकारी कर्मचारी एक- एक करत बाहेर निघत आहे. शासकीय कर्मचारी वेळेचे बंधन पळत नासल्याची अनेकदा ओरड असते. मात्र, त्यांच्यावर अंकुश ठेवणारे लोकप्रतिनिधीही दिलेली वेळ पाळत नसल्याचे दिसून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cabinet Minister Rajesh Tope Absent In Meeting Maharashtra Jalna News