शाळा बंद तरी शेडमध्ये सुरू प्रयोगशील वस्तीशाळेतील शिक्षण 

मधुकर कांबळे  
रविवार, 2 ऑगस्ट 2020

लोकसहभागातून पूर्व प्राथमिक वर्गासाठी स्वयंसेविकेची नेमणूक करून दोन वर्षासाठी हे शिक्षण दिलं जाते. वयाच्या चौथ्या वर्षापासून अनुभवाधारीत शिक्षण दिले जाते.

औरंगाबाद :  शाळा बंद असल्या आणि पुर्व प्राथमिक व दुसरी आणि तीसरीच्या मुलांना ऑनलाइन शिक्षण बंद असले तरी गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गाजरमळा येथील वस्तीशाळेत लोकसहभागातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला जात नाही. शाळा बंद असल्या तरी एका ग्रामस्थाने त्यांच्या शेडमधील एक खोली मुलांसाठी उघडून दिली, शासनाकडून मिळालेली मोफत पाठ्यपुस्तकांचे मुलांना वाटप करून १५ सप्टेंबरपर्यंत अभ्यासक्रम संपवून त्यानंतर एनसीईआरटीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा शिक्षकांचा संकल्प आहे. 

शासन निर्देशाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पूर्व प्राथमिक व दुसरी, तिसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवण्यास प्रतिबंध केला. सतत नवनवीन प्रयोग करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गाजरमळा येथील या शाळेचे मुख्याध्यापक सनी गायकवाड यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला आणि आज विद्यार्थी गटा गटाने अभ्यास करत आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पहिली, दुसरीच्या प्रत्येकी चार विद्यार्थ्यांचे गट तयार केले तर नवोदय विद्यालयात शिकत असलेली मात्र कोरोनामुळे सध्या गावीच असलेल्या याच शाळेतून गेलेल्या मोठ्या विद्यार्थ्यांना गटनायक करून त्यांच्याकडे एक एक गट सोपवण्यात आले आहे. हे गटनायक त्यांना शिकवत आहेत, त्यांचा अभ्यास घेत आहेत. दर तीन दिवसांनी शिक्षक जाऊन काही अडचणी असल्यास त्या दूर करून पुढील अभ्यास देतात तर गटनायक मुले स्वतःचा अभ्यास करत या लहान मुलांचाही अभ्यास घेत आहेत. 

ग्रामस्थाने दिली शेडमध्ये जागा 

शाळेचे मुख्याध्यापक श्री.. गायकवाड यांनी सांगितले, या शिक्षणासाठी ग्रामस्थ गणपत गवळी यांनी त्यांच्या शेडमधील एक खोली मुलांसाठी खुली करून दिली आहे. शासनाकडून मिळालेली मोफत पाठ्यपुस्तके १०० टक्के मुलांना वाटप करून १५ सप्टेंबर पर्यंत त्यांचा अभ्यास संपवून त्यानंतर एन.सी.ई.आर.टी.चा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा मानस आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

या शाळेची गेल्या पाच वर्षांपासून पटसंख्या सातत्याने वाढत आहे. या शाळेच्या सहा विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. जवळच्या गावातील इंग्रजी माध्यमातील मुलेसुद्धा या शाळेत प्रवेश घेत आहेत. गेल्यावर्षी तीन व यावर्षी पाच मुलांनी इंग्रजी माध्यम सोडून या शाळेत प्रवेश घेतला आहे. 

नव्या शैक्षणीक धोरणाची अंमलबजावणी 

नुकतेच नवे शैक्षणिक धोरण जाहीर झाले मात्र इथे विद्यार्थ्यांच्या चौथ्या वर्षापासूनच त्यांना शिकवायला सुरुवात केली आहे. लोकसहभागातून पूर्व प्राथमिक वर्गासाठी स्वयंसेविकेची नेमणूक करून दोन वर्षासाठी हे शिक्षण दिलं जाते. वयाच्या चौथ्या वर्षापासून अनुभवाधारीत शिक्षण दिले जाते. त्यात स्नायूंची खेळाद्वारे हालचाल, स्नायूंचा समतोल व अनुभवातून शिक्षण या गोष्टी शिकविल्या जात असल्याचे मुख्याध्यापक श्री. गायकवाड यांनी सांगितले. 

लोकसहभागातून शाळेने व्हर्च्युअल क्लासरूम, टॅब , ब्रॉडबँड इंटरनेट, हिरवागार आकर्षक परिसर , स्वच्छ व सुंदर वातावरण तयार केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थी तयार करून आंतरराष्ट्रीय पातळीवर ते टिकावेत असा आमचा शिक्षिका वैशाली गोंड , शालेय समितीचे अध्यक्ष व सदस्य आणि पालकांच्या मदतीने सुरू असल्याचे मुख्याध्यापक श्री. गायकवाड यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

लोकसहभागातून पूर्व प्राथमिक वर्गासाठी स्वयंसेविकेची नेमणूक करून दोन वर्षासाठी हे शिक्षण दिलं जाते. वयाच्या चौथ्या वर्षापासून अनुभवाधारीत शिक्षण दिले जाते. लोकसहभागातून पूर्व प्राथमिक वर्गासाठी स्वयंसेविकेची नेमणूक करून दोन वर्षासाठी हे शिक्षण दिलं जाते. वयाच्या चौथ्या वर्षापासून अनुभवाधारीत शिक्षण दिले जाते.लोकसहभागातून पूर्व प्राथमिक वर्गासाठी स्वयंसेविकेची नेमणूक करून दोन वर्षासाठी हे शिक्षण दिलं जाते. वयाच्या चौथ्या वर्षापासून अनुभवाधारीत शिक्षण दिले जाते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Education Started In Shed At Gangapur Aurangabad News