घरोघरी साध्या पद्धतीने ईद उल फित्र साजरी, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घरात ईदची नमाज अदा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनच्या काळात महिनाभर घरात रमजानचे रोजे ठेवल्यानंतर औरंगाबादेत सोमवारी (ता.२५) घरोघरी ईद-उल-फित्र साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. सर्वांनी घरातच कुटुंबासोबत ईद-उल-फित्रची नमाज अदा करुन सर्वत्र शांती, कोरोनामुक्तीसाठी दुआ केली. कोरोनामुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्वांना ईदगाह मैदाने, मशिदीत न जात घरातच नमाज अदा करावी लागली.

औरंगाबाद: कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनच्या काळात महिनाभर घरात रमजानचे रोजे ठेवल्यानंतर सोमवार (ता.२५) घरोघरी ईद-उल-फित्र साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. सर्वांनी घरातच कुटुंबासोबत ईद-उल-फित्रची नमाज अदा करुन सर्वत्र शांती, कोरोनामुक्तीसाठी दुआ केली. कोरोनामुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्वांना ईदगाह मैदाने, मशिदीत न जात घरातच नमाज अदा करावी लागली.

हेही वाचा- शिवसेनेच्या नाकीनऊ आणलेल्या या माजी आमदाराने राजीनामा कुठं दिला?

लॉकडाऊन असल्यामुळे, सोशल डिस्टन्स पाळायचे असल्याने मित्र परिवार, आप्तस्वकीयांची भेट घेता आली नाही. तरीही सर्वांनी फोन आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकमेकांना ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या. दरवर्षी शहरातील छावणी, रोजेबाग, उस्मापुरा, बीडबायपास, पडेगाव येथील ईदगाह मैदान शहरातील जवळपास सर्वच मशिदीत ईद उल फित्रची नमाज अदा केली जाते.

मात्र यंदा प्रथम येथे सर्वसामान्यांना येण्यास मनाई करण्यात आली. लोकांनी ही याचे पालन करत घरातच ईद साजरी करुन शुरखुर्माचा आनंद घेतला. दरवर्षी शहरातील बाजारपेठेत तसेच रस्त्यांवर रमजानची रोनक असते. यंदा मात्र रस्त्यांवर शुकशुकाट आहे. कोरोनाचे गंभीर संकट असल्याने रमजान महिन्यात सर्वांचे व्यवसाय बंद राहिले.

हे वाचंलत का? - आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग

बहुतांश जणांना रोजगार मिळाला नाही. यात कित्येकांना उपासमार सुद्धा सहन करावी लागली आहे. अशा संकटात खरेदीही करता आली नाही. लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने नवीन कपडे आणि शिरखुर्माचे साहित्य सुद्धा बहुतांश जणांनी खरेदीच केले नाही. महिनाभर घरातच रोजे ठेवुन रमजान महिना अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला गेला.

महिनाभर दानधर्म
ईस्लाम धर्माच जकात, फित्रा ला अतिशय महत्व आहे. लॉकडाऊन असले तरी रमजान महिन्यात अनेकांनी गरीबांना अन्नदान, रेशनकिटचे वाटप केले. लॉकडाऊन जाहिर झाल्यापासून काही जण गरीबांच्या वसाहतीत जाऊन अन्नदान करत आहे. रमजान महिना संपला तरी हे अन्नदान सुरुच राहणार आहे. तसेच अनेकांनी गरीबांना जकात देऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.

क्लिक करा- घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eid al-Fitr Celebrating Simply Aurangabad News