औरंगाबादेत रेल्वे स्टेशन परिसरात जुगार अड्ड्यावर छापा, ११ जणांना घेतले ताब्यात, २ लाखांचा ऐवज जप्त

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

रेल्वे स्टेशन भागातील ऑल इंडिया एस्सी, एसटी रेल्वे एम्पलॉईज असोसिएशन शाखेच्या कार्यालय परिसरात जुगार खेळणाऱ्या अकरा जुगारींना उस्मानपूरा पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास करण्यात आली. या जुगारींकडून तब्बल दोन लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

औरंगाबादः रेल्वे स्टेशन भागातील ऑल इंडिया एस्सी, एसटी रेल्वे एम्पलॉईज असोसिएशन शाखेच्या कार्यालय परिसरात जुगार खेळणाऱ्या अकरा जुगारींना उस्मानपूरा पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास करण्यात आली. या जुगारींकडून तब्बल दोन लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

रेल्वे एम्पलॉईज असोसिएशन शाखेच्या कार्यालय परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती रविवारी उस्मानपूरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप तारे यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व त्यांच्या पथकाने छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी जीम ट्रेनर समीर जफर कुरेशी (३२, रा. बन्सलनगर), अरीफ रशीद शेख (४०, रा. जहागीरदार कॉलनी), रवि सुर्यकांत किवळे (३९,रा. रेल्वे कॉर्टर, रेल्वेस्टेशन),

हेही वाचा- एमआयएमच्या माजी नगरसेवकाने साथीदारांच्या मदतीने केला चाकूहल्ला: गुन्हा दाखल

किशोर लक्ष्मण धनेधर (२५, रा. रेल्वे कॉर्टर, रेल्वेस्टेशन), मनोज भास्कर होरे (३६, रा. ईटखेडा,  मोदीनगर), तुषार राजु पवार (२१, रा. सोनिया नगर, बिडवायपास), भाऊसाहेब चंद्रभान बागुल (३०, रा. रेल्वे कॉर्टर, रेल्वेस्टेशन),  बाबासाहेब शेखुजी निकम (५२, रा. कैलास नगर), प्रकाश विश्वनाथ वानखेडे (६०, रा. रेल्चे कॉर्टर, रेल्वस्टेशन), बाळु दगडु शिंदे (६४, रा. फुले नगर, उस्मानपुरा) चंद्रभान तान्हाजी बागुल (६३, रा. रेल्वे कॉर्टर, रेल्वेस्टेशन)

यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ३० हजार १९० रुपये रोख व ७७ हजारांचे मोबाईल याशिवाय तीन दुचाकी असा दोन लाख सत्तावीस हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई सहायक फौजदार सातदिवे, जमादार ठोंबरे, शिपाई सय्यद अश्रफ, संजयसिंग डोभाळ यांनी केली.

हेही वाचा- मध्य प्रदेशच्या भाचीला ६ वर्षांनी सापडली महाराष्ट्रात मामी, एका फोनवर पोलिसांनी घेतला शोध  

 

संपादनः सुषेन जाधव

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven Arrested In The Matter Of Raid Of Gambling In Railway Station Area