एमआयएमच्या माजी नगरसेवकाने साथीदारांच्या मदतीने केला चाकूहल्ला: गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

‘माझ्या वार्डात येऊन कामं करायची हिम्मत कशी काय करतोस’ असे म्हणत एमआयएमच्या माजी नगरसेवकाने दोघा साथीदारांच्या मदतीने तरुणावर चाकू हल्ला केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास चंपा चौकात घडली. या हल्ल्यात शेख अब्दुल रहिम शेख कमरुद्दीन (२८, रा. रशीदपुरा) हा तरुण जखमी झाला आहे.

औरंगाबादः ‘माझ्या वार्डात येऊन कामं करायची हिम्मत कशी काय करतोस’ असे म्हणत एमआयएमच्या माजी नगरसेवकाने दोघा साथीदारांच्या मदतीने तरुणावर चाकू हल्ला केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास चंपा चौकात घडली. या हल्ल्यात शेख अब्दुल रहिम शेख कमरुद्दीन (२८, रा. रशीदपुरा) हा तरुण जखमी झाला आहे.

चंपाचौकातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत. हे खड्डे बुजविण्याचे काम गुरुवारी दुपारी सुरु होते. यावेळी अचानक तेथे आलेल्या एमआयएमच्या माजी नगरसेवक फेरोज मोईनोद्दीन खान, त्याचा भाऊ अफरोज व साथीदार अकबर खान यांनी रोडरोलर चालकाला शिवीगाळ केली.

हेही वाचा- कचऱ्याप्रमाणे व्हेंटीलेटर जिल्ह्यात टाकू दिले, खासदार जलील असे का म्हणाले?

त्यावेळी फिरोज खानला समजावून सांगत असताना त्याने शेख अब्दुल्ला याला माझ्या वार्डात काम करायची हिंमत कशी झाली असे म्हणत दुचाकीच्या डिक्कीतून चाकू काढला. आणि चाकूने डाव्या हाताच्या दंडावर व पाठीवर वार केला. तसेच अफरोज व अकबरने फायटर, रॉडने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरुन जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनंता तांगडे करत आहेत.

विवाहितेचा छळः पतीसह पाच जणांवर गुन्हा 

औरंगाबादः दिराच्या लग्नात त्याच्या पत्नीला घालण्यासाठी विवाहितेचे दागिने मागत तसेच घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये म्हणत छळ करुन विवाहितेस मारहाण करणाऱ्या पतीसह सासू, सासरे, दीर अशा पाच जणांविरोधात जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलंत का- तिला म्हणाले, प्राध्यापकाची नोकरी लावतो, १७ लाखही उकळले, शेवटी तिनेच...

३२ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार सचिन अनिल देशमुख, अनिल अंबादास देशमुख, संदीप अनिल देशमुख या तिघांसह दोन महिलांविरोधात (सर्व रा. चिंचवड, पूणे) गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार विवाहितेच्या दीराचे लग्न होते. दरम्यान दिराच्या पत्नीसाठी फिर्यादी महिलेचे दागिने सासरच्या मंडळींनी मागितले असता विवाहितेने नकार दिला.

यामुळे तिचा शारिरीक मानसिक छळ करण्यात आला. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात येत होता. तिचे दागिने घेऊन सासरच्या मंडळींनी घराचे बांधकाम केले, उर्वरित बांधकामासाठी पून्हा माहेरहून पैसे घेऊन येत म्हणत विवाहितेला त्रास दिल्यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार चव्हाण करत आहेत. 

हेही वाचा- मध्य प्रदेशच्या भाचीला ६ वर्षांनी सापडली महाराष्ट्रात मामी, एका फोनवर पोलिसांनी घेतला शोध 

संपादनः सुषेन जाधव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR Registered Against AIMIM Forner Corporator Aurangabad News