औरंगाबाद : उद्योजक सुनील सिसोदिया यांचे निधन

प्रकाश बनकर
Wednesday, 15 July 2020

शहरातील लघू उद्योजक, शिवसेनेचे उपशहर प्रमुख सुनील सिसोदिया (वय५३) यांचे बुधवारी(ता.१५) आज अल्पशा आजाराने निधन झाले. लाँकडाऊनमध्ये उद्योजक मित्रांना सोबत घेऊन अन्नछत्र चालवून हजारो भुकेलेल्यांना जेवण देणाऱ्या शिवसैनिकाच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

औरंगाबाद : शहरातील लघू उद्योजक, शिवसेनेचे उपशहर प्रमुख सुनील सिसोदिया (वय५३) यांचे बुधवारी(ता.१५) आज अल्पशा आजाराने निधन झाले. लाँकडाऊनमध्ये उद्योजक मित्रांना सोबत घेऊन अन्नछत्र चालवून हजारो भुकेलेल्यांना जेवण देणाऱ्या शिवसैनिकाच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

फुलंब्री तालुक्यातील नायगाव येथील मूळ रहिवासी असलेले सिसोदिया औरंगाबादला आले. शहरात येवून सिसोदिया यांनी परिश्रमाच्या बळावर उद्योग क्षेत्रात आपली छाप पाडली. उद्योग सांभाळीत असताना शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात हिरारिने सहभाग घेतला.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

 लाँकडाऊन सुरू असतांना उद्योजक मित्रांना सोबत घेवून अन्नछत्र चालवून गोरगरिबांना व भुकेल्यांना जेवण दिले. शिवसेनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप , रक्तदान, गरजूंना मदत करीत होते. गेल्या ८ ते १० दिवसापासून ते आजारी होते. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, जावई, भाऊ, बहिण असा परिवार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entrepreneur Sunil Sisodia passes away