सातच्या आत घरात अन्यथा जाल पोलिस ठाण्यात!

मनोज साखरे
बुधवार, 8 एप्रिल 2020

शहरात लॉकडाऊन आहे. मात्र, अनेकजण रस्त्यावर बिनदिक्कत फिरताहेत. त्यांना लगाम लावण्यासाठी शहर पोलिसांनी आता सायंकाळी सात ते रात्री अकरापर्यंत मेडीकल सेवा वगळता सर्वच बाबींना बंदी केली आहे.

औरंगाबाद -दिवसा फिरणाऱ्या व्यक्तींवर एकीकडे ठोस कारवाया आणि गुन्हे दाखल होत असतानाच आता पोलिस प्रशासनाने आणखी कडक धोरण अवलंबले आहे. सायंकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत केवळ मेडिकल दुकानेच उघडी राहणार असून केवळ औषधी खरेदीसाठी बाहेर पडता येणार आहे. इतर कारणांसाठी बाहेर पडाल तर आपल्यावर गुन्हा दाखल होणार आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. शहरात लॉकडाऊनची स्थिती आहे. मात्र, अनेकजण रस्त्यावर बिनदिक्कत फिरताहेत. अशांवर पोलिसांकडून जरब बसविण्यात येत आहे; परंतु किराणा आणि भाजीपाला खरेदीच्या नावाखाली रात्रीही लोक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे आता मेडिकल दुकाने वगळता किराणा दुकाने सायंकाळी सातनंतर बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. सायंकाळी सात ते रात्री अकरापर्यंत ही दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत; अन्यथा अशा दुकानदारांवरही आता कारवाई करण्यात येऊ शकते. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

काहीजण घेतात संधीचा फायदा 
रात्री बाहेर फिरण्याचे कारण काहींना हवे आहे. त्यासाठी किराणा आणि भाजीपाला खरेदीचे कारण दाखवले जाते; परंतु या संधीचा फायदा घेत काही व्यक्ती रात्रीतून दारूचाही सप्लाय करीत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अशांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

औषधी, रुग्णालयात जाण्यासाठी परवानगी 
विविध कारणांनी बाहेर पडणाऱ्यांनी आता सावध राहायला हवे. कारण पोलिस प्रशासनाने एक आदेश काढला आहे. यात केवळ औषधे खरेदीसाठी व वैद्यकीय कारणासाठीच आपल्याला बाहेर पडता येणार आहे. याशिवाय आपण जर बाहेर पडाल तर आपल्यावर कारवाई होऊ शकते, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the evening, if leaving the house, go to the police station