पाऊस पाठ सोडेना; मराठवाड्यातील दहा मंडळात अतिवृष्टी 

शेखलाल शेख
Tuesday, 22 September 2020

मराठवाड्यातील बहुतांश तालुक्यात जोरदार पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहे. मंगळवार (ता.२२) सकाळी साडेदहा वाजेपर्यंत मराठवाड्यातील दहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

औरंगाबाद :  मराठवाड्यातील बहुतांश तालुक्यात जोरदार पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहे. मंगळवार (ता.२२) सकाळी साडेदहा वाजेपर्यंत मराठवाड्यातील दहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ३, लातूर १ तर हिंगोली जिल्ह्यातील सहा मंडळांचा समावेश आहे. मराठवाड्यात सरासरी ९.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मराठवाड्यातील बहुतांश मंडळात जोरदार पाऊस पडत आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातुर, बीड येथील काही मंडळात जोरदार पाऊस झाल्याने धरणे, मध्यम प्रकल्प, तलाव, बंधारे भरले असून नद्या दुथडी भरुन वाहत आहे. मंगळवार (ता.२२) रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या मंडळात पैठण तालुक्यातील ढोरकीन ६८, गंगापुर तालुक्यातील तुर्काबाद ७२.२५, वाळुज ६८ मिमी पाऊस झाला. लातुर जिल्ह्यात जलकोट तालुक्यातील घोणशी मंडळात ८३ तर हिंगोली जिल्ह्यातील तब्बल सहा मंडळात अतिवृष्टी झाली याणध्ये हिंगोली मंडळ ११४.५०, डिग्रस ६८.७५, कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी ९४.२५, नांदापुर ७४.२५, आखाडा ६५, औंढा ८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

औरंगाबाद जिल्ह्यात १९ मिलीमीटर पाऊस 
औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवार (ता.२२) सकाळी साडेदहा वाजेपर्यंत १९.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये औरंगाबाद तालुका २८.२, पैठण २७.६, गंगापुर ३९.६, वैजापुर १५.९, कन्नड १३.२, खुलताबाद २२, सिल्लोड ०.३, सोयगाव ०.१, फुलंब्री १.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excessive rainfall in ten circles Marathwada