सोयगाव : अनुदानाच्या यादीत सापडेनात नावे, शेतकऱ्यांत गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

शेतकऱ्यांच्या खाते जुळवणीमध्ये तलाठी आणि बॅंकांनी दिलेल्या खातेदार शेतकऱ्यांच्या याद्या यामध्ये खात्यात व नावात जुळवणी होत नसल्याने तब्बल 36 लाख रुपये इतका निधी जुळवणीअभावी तहसीलला पडून आहे.

सोयगाव (जि. औरंगाबाद) : सोयगाव तालुक्‍यात जिल्हा बॅंकेच्या सातही शाखांमध्ये शेतकऱ्यांना अवकाळीच्या नुकसानीचे अनुदान वितरण बुधवारपासून (ता. १) हाती घेण्यात आले आहे. महसूल विभागाने दिलेल्या याद्यांनुसार आपली नावे सापडत नसल्याने ती शोधण्याची कसरत शेतकऱ्यांना बँकेत जाऊन करावी लागत आहे. 

महसूल विभागाने जिल्हा बॅंकेच्या सात शाखांमध्ये सात कोटी 56 लाख 68 हजार इतके अनुदान सात हजार 359 शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. उर्वरित अनुदान राष्ट्रीयकृत बॅंकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. 

वाचा बिबट्याच्या तावडीतून असे बचावले दांपत्य

तालुक्‍यात आतापर्यंत दोन टप्प्यात 19 कोटी 75 लाख इतके अनुदान 19 हजार 539 शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहे. यामध्ये जिल्हा बॅंकेच्या सातही शाखांमध्ये अनुदान वितरणाची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. मात्र याद्यांमध्ये नावे सापडत नसल्याने शेतकऱ्यांचा ऐनवेळी मोठा गोंधळ उडाला आहे. 

जुळवणीअभावी निधी पडून 

शेतकऱ्यांच्या खाते जुळवणीमध्ये तलाठी आणि बॅंकांनी दिलेल्या खातेदार शेतकऱ्यांच्या याद्या यामध्ये खात्यात व नावात जुळवणी होत नसल्याने तब्बल 36 लाख रुपये इतका निधी जुळवणीअभावी तहसीलला पडून आहे. 

हे वाचलंत का?- Video : दोन किलो मिठाई खाणारा उंदीर... पहा पराक्रम

अकरा गावांसाठी शिल्लक राहिलेल्या दोन कोटी 88 लाख इतक्‍या निधीत सात गावांच्या दोन हजार 327 शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वर्ग करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे आता सोयगाव तालुक्‍यातील अनुदानाचा विषय संपणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Finding Their Names In Bank Subsidy List Soygaon Aurangabad News