esakal | रब्बीच्या उताऱ्यावर शेतकऱ्यांची भिस्त, बेमोसमी पावसाने खरीप हंगाम कोलमडला
sakal

बोलून बातमी शोधा

0kharip_20tayari1_0

खरीप हंगामातील पिकावरच दसरा, दिवाळी या सणांच्या खर्चासह रब्बीची पेरणी अवलंबून असते. खरिपातील पिकावर बेमोसमी व अतिवृष्टीच्या पावसाचा मोठा परिणाम झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले.

रब्बीच्या उताऱ्यावर शेतकऱ्यांची भिस्त, बेमोसमी पावसाने खरीप हंगाम कोलमडला

sakal_logo
By
बाळासाहेब लोणे

गंगापूर (जि.औरंगाबाद) : खरीप हंगामातील पिकावरच दसरा, दिवाळी या सणांच्या खर्चासह रब्बीची पेरणी अवलंबून असते. खरिपातील पिकावर बेमोसमी व अतिवृष्टीच्या पावसाचा मोठा परिणाम झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. कापूस, ज्वारी पिक मोजकेच हातात आले. त्यामुळे आता रब्बीच्या पिकांच्या उताऱ्यावर शेतकऱ्यांची सर्व काही भिस्त अवलंबून असल्याचे वास्तव दिसत आहे. त्या अनुषंगाने आता रब्बीच्या पूर्व मशागतीच्या कामांनाही हरताळे आणि परिसरात वेग आलेला दिसून येत आहे. या वर्षी मृग नक्षत्राताच वेळेवर पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांनीही खरिपातील पेरणी मिळाली होती.

वेळोवेळीच्या हवामान अंदाजानुसार नियोजन केले. लागवडही व्यवस्थित झाली. परंतु मध्येच अतिवृष्टी ढगफुटीचाही फटका शेतकऱ्यांना बसला. शेतात बहरलेली पिके असताना काढणीच्या वेळेस पावसाने सतत हजेरी लावून पिकांची पुरती वाट लावली होती. खरिपाची सर्वच पिके बाधित झाली. काढणीअभावी पिके शेतात तसेच असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. उत्पन्न घरी आणतामा उशिरा हंगामाला आणि आता उशिराने रब्बीची पेरणी कशाच्या बळावर करायची याची चिंता ही बळीराजाला सतावत असल्याचे दिसत आहे. काही प्रमाणातील कपाशीवरील रोगाने हताश झालेला शेतकरी अनेक उपाययोजना करून देखील कोणत्याच पाहिजे त्या स्वरूपात उत्पन्न मिळाले नसल्याने आता शेतकरी रब्बी हंगामात तरी चांगले उत्पन्न मिळेल काय या आशेने रब्बी हंगामासाठी शेतीची अंतर्गत मशागत उशिराने का होईना मात्र कामाला लागलेला आहे.

संपादन - गणेश पिटेकर