तुर्काबादेत आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण, परिसर सील; घरचे पाच जण क्वारंटाईन

Corona
Corona

लिंबेजळगाव, (जि. औरंगाबाद): दोन दिवसापासून वाळूज, शिवराई नंतर आज शनिवारी (ता.१३) रोजी तुर्काबाद खराडी (ता.गंगापूर) येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याचे वृत्त पसरताच प्रशासन अधिक सज्ज झाले आहे. गावात हा पहिलाच रुग्ण असल्याने तुर्काबादेत खळबळ उडाली आहे. प्रशासनाने सदरचे भाग सील केले आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तुर्काबाद व परिसरात पहिल्या लॉकडाऊनपासूनच कडक संचारबंदी सुरू आहे. त्यासाठी पोलिस ठाणे, आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत, व्यापारी असोशिएशनसह विविध संघटना आपआपल्या स्तरावर कार्यरत आहेत. मात्र अशाही परिस्थितीत जवळच असलेल्या शेजारच्या शिवराईत गुरूवारी एक रूग्ण सापडला होता. त्यात आज शनिवारी (ता.१३) तुर्काबाद खराडीत एक रूग्ण आढळले आहेत.

तुर्काबादचा रूग्ण हे एसटी चालक असून ते लिंबेजळगावच्या खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते. कोरोनाग्रस्त रुग्णाची पत्नी, घरातील नागरिक व शेजारी अशा ५ जणांना गंगापूर येथे क्वारंटाईन केले असल्याचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले. कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून तुर्काबाद ग्रामपंचायत, व्यापारी असोशिएशनसह पोलिस ठाणे आदींची एक चर्चा विनिमय बैठक घेण्यात आली.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्यात उद्यापासून येथील दुकाने दररोज सकाळी ७ ते २ वाजेपर्यत चालू राहतील. त्यानंतर पूर्णपणे दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये दुध, कृषी सेवा केंद्रांचा समावेश नाही. दुध सकाळ- सायंकाळ तर कृषी सेवा केंद्रे पूर्वीच्या वेळेप्रमाणे म्हणजे सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरू राहतील. यावेळी वाळूजचे पोलिस निरीक्षक संदिप गुरमे, सरपंच, उपसरपंच, व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष शरदचंद्र अभंग, चेअरमन सर्जेराव भोंड आदी उपस्थित होते.

पोलिस उपायुक्त खाटमोडे पाटील, उपजिल्हाधिकारी संदिपान सानप, तहसिलदार अविनाश शिंगोटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मंगेश घोडके, पोलीस पाटील रामहरी पाटेकर, सरपंच ज्ञानेश्वर प्रेमभरे, तलाठी अशोक कळसकर आदींनी शुक्रवारी भेटी देऊन सबंधितांना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com