esakal | हृदयद्रावक : एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

 Five dead in Aurangabad district
  • पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील घटना
  • मृतांत चुलत्यासह चार चुलत भावंडांचा समावेश 

हृदयद्रावक : एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विहामांडवा (जि. औरंगाबाद) : सुट्यांमध्ये शेततळ्यात मुलांना पोहणे शिकवत असताना चुलता व चार चुलत भावंडे असा पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना विहामांडवा (ता. पैठण) शिवारातील गट क्रमांक ५११ मधील कोरडे वस्तीवर आज (ता. १२ एप्रिल) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. 

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व शाळेला सुटी आहे. त्यामुळे मुलांना पोहणे शिकविण्यासाठी लक्ष्मण कोरडे हे स्वतःच्या शेतातील शेततळ्यावर दुपारी दोनच्या दरम्यान गेले होते. चार मुलांना पोहणे शिकवत असताना आधी एकजण बुडू लागला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरीही मुले बुडू लागल्याने काही मुलांना वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरीही मुले बुडू लागल्याने लक्ष्मण कोरडे हतबल झाले. त्यांनी मुलांना वाचविण्याचा निकराचा प्रयत्न केला; पण त्यात अपयश आले. चुलता व चार चुलत भावंडे अशा पाचजणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मृतांमध्ये चुलता लक्ष्मण निवृत्ती कोरडे (वय तीस), त्यांचा मुलगा सार्थक लक्ष्मण कोरडे (वय सहा), पुतणे वैभव रामनाथ कोरडे (वय अकरा), अलंकार रामनाथ कोरडे (वय नऊ), समर्थ ज्ञानेश्वर कोरडे (वय नऊ) यांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने कोरडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे विहामांडवा परिसरातही सुन्न वातावरण होते. 
 

आजूबाजूच्या ग्रामस्थांनी मृतदेह काढले बाहेर 
एकाच कुटुंबातील पाचजण बुडाल्याची घटना आजूबाजूच्या लोकांना कळताच त्यांनी शेततळ्यावर धाव घेऊन त्यांना बाहेर काढले व प्राथमिक आरोग्य केंद्र विहामांडवा येथे आणले. तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, पाचोड येथे पाठविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. घुगे यांनी तपासून पाचही जणांना मृत घोषित केले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, ते पुढील तपास करीत आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा