esakal | corona : धक्कादायक... औरंगाबादेत नऊ तासात पाच बळी
sakal

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

रुग्णांची संख्या मंदावत असतानाच नऊ तासात तब्बल पाच जणांचा कोरोनामुळे बळी गेला. पाचपैकी चौघांना इतर व्याधी होत्या. मात्र गंभीर बाब म्हणजे व्याधी नसलेल्या पस्तीस वर्षीय महिलेलाही मृतामध्ये समावेश आहे.

corona : धक्कादायक... औरंगाबादेत नऊ तासात पाच बळी

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णांची संख्या मंदावत असतानाच नऊ तासात तब्बल पाच जणांचा कोरोनामुळे बळी गेला. पाचपैकी चौघांना इतर व्याधी होत्या. मात्र गंभीर बाब म्हणजे व्याधी नसलेल्या पस्तीस वर्षीय महिलेलाही मृतामध्ये समावेश आहे. आता बळींची संख्या तब्बल ५५ इतकी झाली आहे. 

औरंगाबाद शहरातील चार आणि सिल्लोड येथील एका कोरोनाबाधिताचा मृतांत समावेश असून ग्रामीण शहराशिवाय तालुक्यातील हा पहिला बळी आहे. घाटीत आत्तापर्यंत ५० कोरोनाबाधित रुग्णांचा तर जिल्हा रग्णालयात १ आणि खासगी रुग्णालयात ४ अशा एकूण ५५ रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या घाटी रुग्णालयात ७० कोरोनबाधितांवर उपचार सुरू असल्याचेही घाटी प्रशासनाने कळवले आहे. 

क्लिक करा- घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार

नऊ तासातील बळी 
१) कटकट गेट येथील ५५ वर्षीय महिला रुग्णाला २३ मे रोजी घाटीत भरती केले. त्यांचा कोविड अहवाल २४ मे रोजी पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान त्यांचा २४ मे रोजी रात्री ९.३० वाजता मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब होता. 

२) गारखेडा येथील ४० वर्षीय पुरुष रुग्णाला २२ मे रोजी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. २४ मे रोजी त्यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचा याच दिवशी रात्री ९.३५ मिनिटांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना मधुमेह हा आजार होता. 

3) रोहिदास नगर, मुकुंदवाडी येथील ३५ वर्षीय महिलेला घाटीत १८ मे रोजी भरती करण्यात आले होते. १९ मे रोजी त्यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला. २५ मे रोजी पहाटे एकनंतर त्यांचा मृत्यू झाला. 

4) कैलास नगर येथील ७५ वर्षीय महिलेला १९ मे रोजी घाटीत भरती करण्यात आले. त्यांचा कोविड अहवाल २० मे रोजी पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर उपचार सुरु असताना २५ मे रोजी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. कोविडसह उच्च रक्तदाबही त्यांना होता. 

5) सिल्लोड येथील अब्दलशहा नगर येथील ५५ वर्षीय महिला रुग्णाला २० मे रोजी घाटीत भरती करण्यात आले. त्यांचा कोविड अहवाल २२ मे रोजी पॉझिटिव्ह आला. त्यांचा २५ मे रोजी सकाळी ६.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. उच्च रक्तदाब आणि इतर व्याधी त्यांना होत्या. 

हेही वाचा- शिवसेनेच्या नाकीनऊ आणलेल्या या माजी आमदाराने राजीनामा कुठं दिला?

घाटीतून ११ जण कोरोनामुक्त 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ११ कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार झाल्याने ते आज (ता. २५) कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये बेगमपुरा, गांधी नगर, हिमायत नगर, रेंगटीपुरा, मकसूद कॉलनी, बारी कॉलनी, रेहमानिया कॉलनी, वैजापूर, अन्वा-भोकरदन या भागातील रुग्णांचा समावेश आहे.