esakal | देवळाई परिसरात ५ घरफोड्या, आठ तोळ्याच्या दागिन्यांसह ६८ हजारांची रोकड चोरली
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_33

औरंगाबाद शहरालगत असलेल्या देवळाई परिसरातील माऊलीनगरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोडी करून आठ तोळ्याच्या दागिण्यांसह ६८ हजाराची रोख रक्कम लंपास केली आहे़.

देवळाई परिसरात ५ घरफोड्या, आठ तोळ्याच्या दागिन्यांसह ६८ हजारांची रोकड चोरली

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : शहरालगत असलेल्या देवळाई परिसरातील माऊलीनगरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोडी करून आठ तोळ्याच्या दागिण्यांसह ६८ हजाराची रोख रक्कम लंपास केली आहे़.ही घटना मंगळवारी (ता.८) भल्या पहाटे घडली़ या घटनेनंतर माऊलीनगर परिसरात भितीचे वातवरण निर्माण झाले आहे. शहर आणि परिसरात सराईत गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. रस्त्यात अडवून लुटमार, धाडसी चोरी, अपहरण सारख्या गंभीर गुन्ह्यांसह गुटखा, रेशनचा काळाबाजार, अमली पदार्थांची तस्करी जोरात सुरू आहे.

मंगळवारी माऊलीनगरात माऊलीनगरात धुमाकूळ घातला. कामगारांच्या घरात शिरुन चोरी करण्यात आली. अन्य एका घरात चोरी करतांना कुटुंब जागी झाल्याने चोरट्यांनी धूम ठोकली. हेडगेवार रुग्णालयात ब्रदर असणाऱ्या कामगाराच्या घराचे पाठीमागील दार तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. त्यानंतर चोरट्यांनी याच गल्लीतील अन्य चार घरांमध्ये हात मारला.

सहाव्या घराचा दरवाजा तोडण्याचा आवाज आल्याने घरातील सदस्य झोपेतून जागे झाले. यावेळी घरात चोर शिरल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरांनी आत शिरताच कुटुंबातील लोकांनी आरडा-ओरड करताच चोरटे पसार झाले. माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांचे पथक घटनास्थळावर पोचले. शहर आणि शहरालगतच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी ही विशेष पथकांच्या कारभारावर संशय निर्माण करणारी ठरत आहेत.


नागरिकांचाच आहे पहारा
एकाच दिवशी पाच ठिकाणी घरफोडी झाल्याने नगरिकांमध्ये भितीचे वातावरण असून या भागात नागरिकच पाहारा देत आहेत. चिकलठाणा पोलिसांनी या भागात गस्त देखील वाढविली आहे. तरुणाचे दोन गट दोन सत्रात पहारा देत असून पोलिसांवर अवलंबून रहायला नकोच, असे नागरिकांनी सांगितले.

Edited - Ganesh Pitekar