कितीही मुहूर्त काढले तरी सारीपटावर पाच वर्ष महाआघाडीच राहिल, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकरांचा भाजपला टोला

ईश्‍वर इंगळे
Friday, 27 November 2020

सत्तेसाठी कितीही मुहूर्त काढले आणि येऊ म्हटले तरी सत्तेच्या सारीपटावर पाच वर्ष महाआघाडीच राहिल असा विश्वास व्यक्त करत भाजपसाठी सत्ता हा विषयच नाही, असा टोला शिवसेना उपनेते तथा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी भाजपला लगावला.

सोयगाव (जि.औरंगाबाद) : सत्तेसाठी कितीही मुहूर्त काढले आणि येऊ म्हटले तरी सत्तेच्या सारीपटावर पाच वर्ष महाआघाडीच राहिल असा विश्वास व्यक्त करत भाजपसाठी सत्ता हा विषयच नाही, असा टोला शिवसेना उपनेते तथा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी भाजपला लगावत आगामी नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय तयारी करून कामाला लागण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. सोयगाव येथे शुक्रवारी (ता.२७) शिवसेनेच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी व्यासपीठावरून उपनेते विनोद घोसाळकर बोलत होते.

नगरपंचायतीची निवडणूक ही शिवसैनिकांची निवडणूक आहे. त्यासाठी १७ च्या १७ जागा निवडून आणावयाच्या असल्याने शिवसैनिकांनी कामाला लागून आजपासूनच प्रचाराची धुरा हाती घ्यावयाची असल्याचे श्री.घोसाळकर यांनी सूचना केली. यावेळी जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, युवानेते अब्दुल समीर, उपजिल्हा प्रमुख रघुनाथ चव्हाण, तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, अंकुश रंधे, जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव, किशोर अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल, राजू गोर, सुधाकर पाटील, तालुका संघटक दिलीप मचे, डॉ.अस्मिताताई पाटील आदींची उपस्थिती होती. तालुका प्रमुख प्रभाकर काळे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी डॉ.पाटील, अग्रवाल, मचे, अब्दुल समीर, नरेंद्र त्रिवेदी, आमदार दानवे आदींनी मनोगत व्यक्त केले.

श्री.घोसाळकर म्हणाले, की कोरोना काळात जागतिक आरोग्य संघटनेने राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कर्तृत्वाची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अव्वल असल्याचा दाखला दिला असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे केंद्रातून कितीही अडचणी निमार्ण केल्या तरी राज्य सरकार निर्णयावर ठाम राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी शहराध्यक्ष संतोष बोडखे, उस्मान पठाण, रमेश गव्हांडे, दिलीप देसाई, दिनेश हजारी, नंदू हजारी, चंद्रास रोकडे, अक्षय काळे, योगेश नागपुरे, विक्रम चौधरी, विनोद मिसाळ यांच्यासह शिवसेना व युवासेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five Years Mahaaghadi Will Complete, Shiv Sena Leader Vinod Ghosalkar Attack On BJP