esakal | आमची सत्ता येणार असे म्हणत आमदारांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लादायची, जयंत पाटलांची भाजपवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

jayantpatil

मराठवाड्यासाठी अतिरिक्त पाणी आणणे ही भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. निवडणूक आचारसंहिता असल्याने घोषणा करता येणार नाही, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येथे दिली.

आमची सत्ता येणार असे म्हणत आमदारांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लादायची, जयंत पाटलांची भाजपवर टीका

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर  : काँग्रेस व राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्यांना थांबवण्यासाठी सध्या भाजपकडून येत्या दोन महिन्यांत आमचीच सत्ता येईल असे सांगितले जात आहे. त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व न देता आपण आपले काम करत राहावे. मराठवाड्यासाठी अतिरिक्त पाणी आणणे ही भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. निवडणूक आचारसंहिता असल्याने घोषणा करता येणार नाही, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येथे दिली.


औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातील महविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (ता.२६) आयोजित पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री अमित देशमुख, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार विक्रम काळे, माजीमंत्री जयसिंगराव गायकवाड, बाळासाहेब जाधव उपस्थित होते.


येत्या दोन महिन्यानंतर आमची सत्ता येणार असे म्हणत आमदारांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लादायची व भाजपचे सरकार स्थापन करायचे असा विचार ते करीत आहेत. त्यांना जनता वेळप्रसंगी उत्तर देईल असे सांगत पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन श्री.पाटील यांनी यावेळी केले. यावेळी श्री पाटील यांनी विलासरावांच्या आठवणींना उजाळा दिला. आमदार बाबासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले.

Edited - Ganesh Pitekar