
औरंगाबाद : ज्यांना वाचा असते ते बोलून मिळवू तरी शकतात. मात्र ज्यांना बोलता येत नाही, मुके आहेत त्या मुक्या जीवांचे काय अशीच स्थिती कोरोनाकाळात झाली असती मात्र मुक्या जीवांवर प्रेम करणाऱ्या औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशन या संघटनेच्या प्राणिमित्रांनी लॉकडाऊनच्या काळात मार्चपासून रस्त्यावरच्या दोन हजाराहून अधिक कुत्र्यांना दूध, पोळी, बिस्किटे, पेडीग्री खाऊ घालून भूतदयेचे काम केले.
लॉकडाऊन संपल्यानंतरही मोकाट कुत्र्यांची भूख भागली पाहिजे यासाठी प्रत्येक वॉर्ड, कॉलनीमध्ये फिडींग स्टॅण्ड सुरू करण्याचे नियोजन असल्याचे औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनच्या (अपला) अध्यक्षा बेरील संचिस यांनी सांगितले.
औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
मुक्या जीवांना काही रोग झाल्यास औषधोपचार, भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, त्यांना अँटीरेबीजसह अन्य जीवनावश्यक औषधी देऊन त्यांचे महत्त्वाचे लसीकरण करून पुन्हा संबंधित ठिकाणी सोडून दिले जातात. बेरील संचिस यांनी सांगितले, औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनची स्थापना गेल्या वर्षी आठ मार्च रोजी झाली असून २५० सदस्य सेवाभाववृत्तीने रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी काम करत आहेत. आम्ही भटक्या श्वानांचे व इतर प्राण्यांचे शंभराहून अधिक प्राणी दत्तक घेतले आहेत.
याशिवाय गेल्यावर्षी रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी शंभराहून अधिक ठिकाणी सिमेंटची पाण्याची भांडी बसवून तिथे पाणी पिण्याची व्यवस्था केली. अँटी रेबीज लसीकरण शिबिर घेऊन ८९ कुत्र्यांचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे. तसेच सर्व पोलिस स्टेशनमध्ये अॅनिमल राईट्स बोर्ड बसवून जनजागृती केली आहे. याशिवाय आता लवकरच अपला समूह प्रत्येक वॉर्डमध्ये, कॉलनीमध्ये यांच्यासाठी फिडिंग स्टँड स्थापन करणार आहोत. सर्व फिडर्सनी कुत्र्यांना स्वच्छ आणि आहाराबाबत काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करणार आहोत.
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
दफनभूमीचा महापालिकेला प्रस्ताव
पाळीव असो की रस्त्यावरचे कुत्रे त्यांचा दफनविधी करण्यासाठी दफनभूमी नाही. महापालिकेने कुत्र्यांच्या दफनभूमी तयार करावी अशा मागणीचा महापालिकेकडे प्रस्ताव देण्यात आल्याचे बेरील संचिस सांगून त्या म्हणाल्या, पाळीव कुत्रे घाण करतात असा लोकांचा आक्षेप असतो यामुळे जसे माणसांना फिरण्यासाठी उद्याने आहेत तशी पाळीव प्राण्यांसाठीही शहरात पार्क असली पाहिजे, ऊन पावसापासून रस्त्यांवरच्या कुत्र्यांचा बचाव होण्यासाठी बसस्टॉप स्वरूपात वेगवेगळ्या भागात निवारा केला जावा यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत.
दोन हजारावर कुत्र्यांवर लॉकडाऊनमध्ये भूतदया बेरील संचिस म्हणाल्या, लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरच्या कुत्र्यांना पोळ्या, दूध, बिस्किटे, पेडिग्री, भात खाऊ घालून जगवण्याचे काम प्राणिमित्रांनी केले आहे. सुमारे २ हजारावर कुत्र्यांना मार्चपासून दररोज अन्न दिले जात होते आणि अजूनही सुरू आहे क्षमा कुरे, सोमनाथ बोंबले, अजय राणा, डॉ. निरू लोया, पुरबी बॅनर्जी,बेरील संचिस यांनी कोरोनाच्या काळातही रस्त्यांवरच्या कुत्र्यांची उपासमार होऊ नये यासाठी परिश्रम घेतले असून अद्यापही घेत आहेत.
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.