esakal | माथाडी मंडळात करोडोंचा गैरव्यवहार, खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

0Imtiaz_20Jaleel_0

माथाडी व असंरक्षीत कामगार मंडळात झालेल्या कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी (ता.पाच) पत्रकार परिषदेत केला आहे.

माथाडी मंडळात करोडोंचा गैरव्यवहार, खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : माथाडी व असंरक्षीत कामगार मंडळात झालेल्या कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी (ता.पाच) पत्रकार परिषदेत केला आहे. माथाडी बोर्डात नोंदणीकृत कामगारांची वर्षानुवर्षपासून आर्थिक पिळवणुक होत असल्याने अनेक कामगारांनी खासदारांकडे तक्रार नोंदविली होती. त्यानंतर शनिवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.

भविष्य निर्वाह निधी कार्यालय, कामगार कार्यालय यांच्यासोबत हातमिळवणी करुन कामगारांना मिळालेल्या मजुरीतुन लेव्हीच्या नावाखाली ३० टक्के रक्कम वसुली करुन औरंगाबाद माथाडी मंडळ संचालकांनी कोट्यावधीची लूट केली असल्याचे गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केले. या लेव्हीतून माथाडी कामगारांना भविष्यनिर्वाह निधी, घरभाडे भत्ता, आजारपण-सणांची रजा, दिवाळी बोनस, पगारी रजा, वैद्यकीय सुविधा, अपघात नुकसान भरपाई अशा विविध सुविधा दिल्या जाणे बंधनकारक आहे परंतु तसे काहीच होत नाही. सदरील संपुर्ण घोटाळ्याची आर्थिक गुन्हे शाखा, अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो तसेच गरज पडल्यास सीआयडी, सीबीआय व ईडी मार्फत सुध्दा चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली

Edited - Ganesh Pitekar.