कर्ज काढून बनवला गाण्यांचा अल्बम

Got Loan And Making Song Album Aurangabad News
Got Loan And Making Song Album Aurangabad News

औरंगाबाद : जागरण गोंधळ, भारुड शाहिरीची परंपरा रामानंद व कल्याण उगले यांनी पुढे चालवित त्यास आधुनिकतेची जोड दिली. त्यानंतर स्वतःचा अल्बम काढण्यासाठी झपाटलेल्या दोघांनी कर्ज काढून ‘लगबग लगबग माझ्या रायाची, गड जेजुरी जायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची’ हे गाणे रेकॉर्ड केले आहे. आषाढीच्या दिवशी हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. सध्या सोशल मीडियावर ते गाजत आहे. 

रामानंदचा खडा आवाज आणि कल्याणची ढोलकी व खंजिरीच्या वाद्याची मिळालेल्या सादमुळे हे गाणे अल्पवधितच सर्वदूर पोचले आहे. नगर जिल्ह्यातील बेले गावचे विलास अटक हे या गाण्याचे मूळ लेखक आहेत. रामानंद व विलास अटक या दोघांच्या आवाजात हे गाणे रेकॉर्डिंग करत रिलिज केले आहे. रामानंद व कल्याण या दोघांचे अल्बम बनवणे हेच स्वप्न होते. मात्र आर्थिक अडचण होती. शाहिरी, जागरण गोंधळाचे कार्यक्रम करत त्यांनी पै पै जमा करण्याचा प्रयत्न केला. तोही अत्यल्प ठरत होता. याच दरम्यान दूरचित्रवाहिनीवरील संगीत सम्राट या कार्यक्रमात त्यांना संधी मिळाली.

त्यात दोघांचेही बहारदार सादरीकरण केले, आणि औरंगाबाद जालना यापुरते मर्यादित असलेली रामानंद, कल्याण यांची कला ही राज्यभर पोचली. तथापि, अल्बम काढण्याचे स्वप्न काही पाठ सोडत नव्हते. लॉकडाउनच्या काळात त्यांनी नातेवाईकांकडून ५० हजार रुपये व अन्य एका डॉक्टरकडून ५० हजार कर्ज काढत हे गाणे रेकॉर्डिंग केले. यात जुन्या-नव्या वाद्याची जोड देण्यात आले आहे. 

औरंगाबादमध्ये स्टुडिओमध्ये हे गाणे रेकॉर्ड करण्यात आले. गाण्यासाठी ढोलकी आणि रिदम कल्याण उगले यांनी केले. गाण्याची मिक्सिंग दर्शन पेडगावकर यांनी केली. कोरस सुकन्या मिसाळ, शिवानी कुलकर्णी, विशाल उगले ,किशोर धारासुर, श्वेता कुलकर्णी, रोहित काटे, मनोज थोरे, सुमित्रा कलाकडे, प्रीती सोनवणे यांनी तर संकेत राजपूत, बाळकृष्ण धारबळे, शैलजा कुलकर्णी यांनी साथ सांगत केली. 

स्वतःचा अल्बम काढणे हे आमचे स्वप्न आहे. ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आम्ही नातेवाइकांकडून कर्जही काढले. आपले काम दर्जेदार व्हावेत त्यादृष्टीने जुन्या-नव्या वाद्याची सांगड घालत हे गाणे तयार केले आहेत. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
-कल्याण उगले, वादक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com