Gram Panchayat Election : गंगापूरमधील मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त

जमील पठाण 
Friday, 15 January 2021

तालुक्यात पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

कायगाव (औरंगाबाद) : गंगापूर तालुक्यातील अमळनेर येथे राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था टिकावा आणि मतदान शांततेत व कोविड -19 च्या सर्व नियमाचे तंतोतंत पालन करून सुरळीत पार पडावे, यासाठी गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिसांनी व्यवस्थित काळजी घेतली आहे.

औरंगाबादच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

तालुक्यात पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान मतदान केंद्रावर मतदानास येणाऱ्या मतदारांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी, दक्षता म्हणून आरोग्य विभागाद्वारे ऑक्सिमीटर, तापमापी गणने शरीराच्या तापमानाची तपासणी करूनच मतदानास सुरक्षित अंतर ठेवून मास्क, रुमाल बांधून मतदानाचा हक्क बजावत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मतदान प्रक्रिया शांततेत व कोविड -19 च्या सर्व नियमांचे पालन करून आणि आदर्श आचारसंहिताच्या नियमांचे तंतोतंत पालन करून मतदारांनी कोणाच्या हुलथापा, आमिषाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पडावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुरवसे यांनी केले आहे. शुक्रवारी सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच दरम्यान ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.

पोलिसांनी संवेदनशील असलेल्या जामगाव, अमळनेर, कायगाव, गणेशवाडी या ठिकाणच्या मतदान केंद्रावर विशेष लक्ष देऊन मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच या भागात ऊसतोडणीस आलेले ऊसतोड मजूर, ऊस वाहतूक करणारे चालक मालक, कर्मचारी देखील निवडणूक असलेल्या गावी, बाहेरगावी जाऊन मतदान हक्क बजावत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election gangapur political news aurangabad