Gram Panchayat Election: तोडोंळीत ग्रामविकास पॅनलचे सर्व उमेदवार विजय; विजयानंतर शिवाजी महाराजांना अभिवादन

ज्ञानेश्वर बोरुडे
Tuesday, 19 January 2021

येथे नऊ जागांसाठी ग्रामविकास व शेतकरी पॅनलमध्ये लढत झाली. यात माजी सरपंच संजय गरड यांच्या पॅनलने एकतर्फी नऊ पैकी नऊ जागांवर निर्विवाद विजय मिळवला आहे.

लोहगाव (औरंगाबाद): तोडोंळी ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास पॅनलने शेतकरी ग्रामविकास पॅनलवर मात करत नऊ पैकी नऊ जागी विजय मिळवला आहे. या विजयाने तोंडोळीत ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

येथे नऊ जागांसाठी ग्रामविकास व शेतकरी पॅनलमध्ये लढत झाली. यात माजी सरपंच संजय गरड यांच्या पॅनलने एकतर्फी नऊ पैकी नऊ जागांवर निर्विवाद विजय मिळवला आहे. यामुळे ग्रामविकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे.

माझ्यात विकास कामे करण्याची क्षमता गावकर्‍यांना वाटली नसेल, त्यामुळेच माझा पराभव- अनुराधा पेरे पाटील | eSakal

यामध्ये विष्णू लक्ष्मण शेळके, सिमा काशिनाथ गरड, मधुकर सुर्यभान नरवडे, संगिता चंद्रकांत आगळे, रूकशानाबी शम्मू पठाण, रामचंद्र आसाराम तांबे, संजय साडू गरड, वर्षा अरूण गरड, सुरेखा सत्यवान तांबे, हे उमेदवार विजयी झाले आहेत.

सर्व उमेदवारांनील विजयानंतर गावातील शिवाजी महाराज पुतळ्याला आभिवादन केले. तसेच फटाके गुलाला उधळत विजयोत्सव साजरा केला. यावेळी अनिल गरड,भारत गरड,अरूण तांबे, प्रभाकर तांबे, आदीनी उमेदवारांचे स्वागत केले.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election result lohgaon aurangabad political news