esakal | माझ्यात विकास कामे करण्याची क्षमता गावकर्‍यांना वाटली नसेल, त्यामुळेच माझा पराभव- अनुराधा पेरे पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

pere patil

आदर्श पाटोदा गावात सत्तांतर, लोकशाही ग्रामविकास पॅनलने पटकावल्या सर्व जागा भास्कराव पेरे पाटीलांच्या मुलीचाही पराभव

माझ्यात विकास कामे करण्याची क्षमता गावकर्‍यांना वाटली नसेल, त्यामुळेच माझा पराभव- अनुराधा पेरे पाटील

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पाटोदा (औरंगाबाद): निकाल जाहीर होताच लोकशाही ग्रामविकास पॅनलच्या समर्थकांनी जल्‍लोश केला. दरम्यान सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलीस उपनिरीक्षक शंकर सिरसाट, कारभारी नलावडे आदींनी गावात भेट देवून आपणच गावाचे रक्षणकर्ते आहात, त्यामुळे राजकारण व मतभेद सोडून गावाच्या विकासावर भर द्या. तसेच अनुचित प्रकार घडु नये यासाठी गावात शांतता ठेवून मिरवणूक न काढण्याबाबत सूचना दिल्या.

राजकरणातून निवृत्‍त -भास्कराव पेरे पाटील
नवीन पिढीला संधी मिळावी. यासाठी मी गेल्या सहा महिन्यापुर्वीच राजकरणातून निवृत्‍त झालो आहे. गावाच्या विकासासाठी मी सदैव कटीबद्ध राहील. गेल्या दोन तासापुर्वीच मी दलित वस्तीच्या विकासासाठी वीस लाख रुपयाचा निधी मंजुर केला, असे भास्करराव पेरे पाटील यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाले. यावेळी त्यांनी निवडून आलेल्या उमेदवारांना शुभेच्छाही दिल्या.

भाजपा लढणार औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्व जागा

लोकशाही आहे - अनुराधा पेरे
माझ्या वडिलांनी गावाच्या सेवेसाठी 25 वर्षे दिली. भास्करराव पेरे हे लोकहित व जनजागृतीसाठी राज्यभर फिरत असतात. मतदानाच्या दिवशीही ते गावात नव्हते. वडिलांनी गावात अनेक विकास कामे केली. मात्र माझ्यात विकास कामे करण्याची क्षमता गावकर्‍यांना वाटली नसेल. त्यामुळेच माझा पराभव झाला असावा. मला निवडणुक लढण्याची इच्छा होती. त्यामुळे मी स्वत: या निवडणुकित उतरले. मात्र लोकशाही आहे, मतदारांनी दिलेला कौल मला मान्य आहे. असे अनुराधा पेरे म्हणाल्या.

आई विरुद्ध मुलाच्या पॅनलमध्ये मुलाची बाजी; पंचरंगी लढतीत कोणालाही बहुमत

विकासासाठी मला मतदान - मंदा खोकड
मी ज्या प्रभागात राहते, त्या प्रभागात शंभरच्यावर मतदार आहेत. या प्रभागात ग्रामपंचायतीने काहीही विकास केला नाही. त्यामुळे आजही येथे राशन दुकान, स्वच्छता, अंगणवाडी आदी समस्या आहेत. त्या अद्यापही न सुटल्यामुळे मतदारांनी मला मतदान करून निवडून दिले. अशी प्रतिक्रिया भास्करराव पेरे पाटील यांच्या मुलीच्या विरोधात निवडून आलेल्या मंदा खोकड यांनी दिली.