esakal | बबनराव लोणीकरांच्या जावयांची हॅट्ट्रीक, चापानेवर ग्रामपंचायतीत किशोर पवारांच्या पॅनलचा पाचव्यांदा विजय
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat Election Results Chapaner

वडिलांचा वारसा जोपासत जनतेची सेवा करत आणि केलेल्या कामाच्या बळावर या निवडणुकीत पुन्हा किशोर आबा पवार पॅनलचे उमेदवार निवडणुकीत उतरले होते.

बबनराव लोणीकरांच्या जावयांची हॅट्ट्रीक, चापानेवर ग्रामपंचायतीत किशोर पवारांच्या पॅनलचा पाचव्यांदा विजय

sakal_logo
By
वाल्मिक पवार

चापानेर (जि.औरंगाबाद) : चापानेर(ता.कन्नड) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री  तथा आमदार बबनराव लोणीकर यांचे जावई जिल्हा परिषद सदस्य किशोर आबा पवार यांचे खोलेश्वर ग्रामविकास पॅनल सलग पाचव्यांदा विजयी मिळविला आहे. खोलेश्वर ग्रामविकास पॅनलमधील ११ पैकी दहा उमेदवार विजयी झाले असून एकूण उमेदवार अपक्ष निवडून आले आहे. चापानेर ग्रामपंचायत किशोर पवार यांच्या वडिलांच्या ही सलग वीस वर्षे ताब्यात होती.

वडिलांचा वारसा जोपासत जनतेची सेवा करत आणि केलेल्या कामाच्या बळावर या निवडणुकीत पुन्हा किशोर आबा पवार पॅनलचे उमेदवार निवडणुकीत उतरले होते. त्यांनी केलेली कामे पाणीपुरवठा विभागामार्फत पाच कोटीची पाईप लाईन, गावातील सिमेंट रस्ते, चापानेर गावात उभारलेले भव्य दिव्य अशी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत, पाण्याच्या टाक्या स्मशानभूमी अशा अनेक विकासात्मक कामाच्या जोरावर त्यांनी यावेळी जनतेला आवाहन करून मतदान मागितले होते.

मतदारांनी देखील आजचा निकालात स्पष्ट बहुमत देत खोलेश्वर ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशोर आबा पवार यांनी मतदारांची जाहीर आभार व्यक्त केले. मतदारांनी निवडून दिल्याबद्दल हा विजय माझा एकट्याचा किंवा पॅनलचा नसून सर्व नागरिकांचा आहे. या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.


संपादन - गणेश पिटेकर