अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंची परळीत दिसली ‘पावर’, भाजपने जिंकला ‘भोपळा’

प्रवीण फुटके
Monday, 18 January 2021

परळी वैजनाथ तालुक्यातील सात ग्रामपंचायतींपैकी सहावर राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली आहे.

परळी वैजनाथ (जि.बीड) : तालुक्यातील सात ग्रामपंचायतींपैकी सहावर राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली आहे. यातून अडचणीत सापडलेल्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचा परळीत पावर दिसली आहे. दुसरीकडे भाजपने फक्त भोपळा ही एकच ग्रामपंचायत जिंकली आहे. तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या ५७ जागांसाठी मतदान झाले होते. सोमवारी (ता.१८) येथील तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली.

मतमोजणीसाठी चार टेबल करण्यात आले होते. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया चोख बंदोबस्तात पार पडली. विजयी उमेदवारांनी तहसीलच्या प्रांगणात जल्लोष केला तर पराभूत उमेदवार नाराज होऊन गावाकडे परत गेले. ७ पैकी ६ ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या असल्याचा दावा राष्ट्रवादी करून करण्यात आला आहे.

रेवली ग्रामपंचायतीसाठी एकाच जागेसाठी निवडणूक झाली. ग्रामपंचायत बिनविरोध होत असतांना ज्या व्यक्तीमुळे निवडणूक घ्यावी लागली  यात विजय सायसराव बडे हे उमेदवार विजयी झाले. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भोपळा ग्रामपंचायतीमध्ये (वार्ड क्र.१)  बाळासाहेब मुंडे, अज्ञान मुंडे, (वार्ड २), आशा मुंडे, मुंडे आत्माराम निवृत्ती मुंडे (वार्ड ३), अमृत मुंडे, उषा अंकुश मुंडे, मोह्यात (वॉर्ड क्र ११) अजय बुरांडे, सुनीता हरिश्चंद्र चाटे (वॉर्ड -२) संदीप रामकृष्ण देशमुख, शिला उद्धव शिंदे, रुक्मिन शेप (वॉर्ड -३) हरिभाऊ बालासाहेब शिंदे, कुशावर्ता शिंदे, मीराबाई संग्राम देशमुख, (वॉर्ड ४) मदन लिंबराज वाघमारे, रेखा संदीप देशमुख, विलास उत्तम देशमुख, गडदेवाडी – (वॉर्ड-१) – नामाजी निवृत्ती गडदे, जिजाबाई बाबुराव गडदे, गडदे पूजा शिवहारी (वॉर्ड -२) पवार सुशांतसिंह, गडदे लता सुग्रीव (वॉर्ड -३)
लाडझरी – (वॉर्ड -१)  राजाराम पंडितराव मुंडे, रामराव माणिक चाटे, रुक्मिणीबाई परमेश्वर चाटे, (वॉर्ड -२) विठ्ठल दगडू कांबळे , मंगलबाई व्यंकट मुंडे, सरस्वती वैजनाथ मोटे (वॉर्ड -३) शिरीष दत्तात्रय नाकाडे, गोमसळे भरातभाई एकनाथ गोमसळे, संगीता महादेव मुंडे सरफराजपुर – (वॉर्ड -१)  राठोड कविता कुंडलिक राठोड, शशिकला रामदास काळे, वर्षा अरुण घाडगे, (वॉर्ड -२) घाडगे अंगद भास्कर घाडगे,  मीरा रमेश राठोड, घाडगे सुमन भागवतराव घाडगे, (वॉर्ड -३) भाग्यश्री रामभाऊ घाडगे हे उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान या ग्रामपंचायत निवडणूकीत ७ पैकी ६ ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या असल्याच्या दावा  केला असून एक ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आली आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Election Result Parli Dhananjay Munde Groups Win