esakal | केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का, मात्र मुलीने राखला गड
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat Election Result Bhokardan

खासदार दानवेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपला निकालात धक्के मिळत असल्याचे दिसून येत आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का, मात्र मुलीने राखला गड

sakal_logo
By
दीपक सोळंके

भोकरदन (जि.जालना) : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यातून निसटताना दिसत आहे. खासदार दानवेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपला निकालात धक्के मिळत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या. त्यात पाच ग्रामपंचायती उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच बिनविरोध झाल्याने ८६ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले.

या निवडणुकीत ग्रामपंचायत निवडणुकीचा मोठा टप्प्या व अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतींच्या असल्याने गावपातळीवरील स्थानिक नेत्यांसह विविध पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. दरम्यान सोमवारी (ता.१८) निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. दुपारी एक वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालात भाजपला अनेक मोठ्या व महत्त्वाच्या ग्रामपंचायतीत धक्के बसतांना दिसून आले. अनेक वर्षांपासून वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायतीतही दारुण पराभव मिळाल्याने हा ऐका प्रकारे हा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाच मोठा धक्का मानला जात आहे.


भाजप तालुकाध्यक्षांच्या ग्रामपंचायत ताब्यातून निसटली
भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांची पिंपळगाव रेणुकाई ही महत्त्वाची ग्रामपंचायतही भाजपच्या ताब्यातून निसटली असून, यासह सिपोरा बाजार, सुरंगळी, फत्तेपुर, आलापूर, वदोड तांगडा, बोरगाव जंहागिर, बाभूळगाव, जळगांव सपकाळ, जवखेडा ठोंबरे या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीतही भाजपला पराभव स्वीकारावा लागल्याचे दिसत आहे.


मुलीने राखला गड
दरम्यान एकीकडे अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यातून गेल्याचे चित्र असताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या तथा जिल्हा परिषद सदस्या आशा मुकेश पांडे यांनी दगडवाडी ग्रामपंचायतीत गड राखला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image