esakal | अखेर शहरातील सात बोगस व्यापाऱ्यांचे जीएसटी क्रमांक होणार रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

gst.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यकर जीएसटीच्या अन्वेषण विभागाने ही कारावाई केली

अखेर शहरातील सात बोगस व्यापाऱ्यांचे जीएसटी क्रमांक होणार रद्द

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून जीएसटी क्रमांक मिळवत कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करणाऱ्या बोगस व्यापाऱ्यांवर राज्यकर जीएसटीने कारवाई केली आहे. शहरातील सात बोगस व्यापाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली.

या सात व्यापाऱ्यांचे जीएसटी क्रमांक रद्द करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. त्यानंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदविले जाणार आहे, अशी माहिती राज्यकर जीएसटीचे उपायुक्त रवींद्र जोगदंड यांनी दिली.

सिल्लोड तालुक्यातील पळशीत दोन गटांत तुंबळ हाणामारी, ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून भांडण

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यकर जीएसटीच्या अन्वेषण विभागाने ही कारावाई केली. शहरातील मे. इंद्र ट्रेडर्स, मे. पूर्ती कन्स्टक्शन, विधाता मेटल्स, मे. सृष्टी इम्पेक्स, विधी एंटरप्रायजेस, जय गणेश कार्पोरेशन, एम.के इंटरप्राईजेस यांनी खोटी कागदपत्रे दाखल करीत जीएसटी क्रमांक मिळवला होता.

यातून व्यापाऱ्यांनी शंभर कोटी पेक्षा जास्त रक्कमेची खोटे देयके निर्गमित करून शासनाच्या महसूलाची हानी केल्याचे जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

(edited by- pramods sarawale)