अवजड वाहतुकीमुळे रस्ता बनला अवघड ! सिल्लोड तालुक्यातील चित्र

Road In Sillod Taluka
Road In Sillod Taluka

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : तालुक्यातील रस्त्यांची चाळणी झाली असून, राष्ट्रीय महामार्गापासून सारोळा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे तीनतेरा वाजले आहेत.राष्ट्रीय महामार्गावरील रस्ताकामासाठी सारोळा गावाजवळ खडी केंद्र उभारण्यात आले आहे.या खडी केंद्रातून दिवसरात्र अवजड वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात गौण खनिजाची वाहतूक होत असल्यामुळे रस्ता जागोजागी उखडला गेल्याची ओरड  गावकरी करू लागले आहेत. संबंधित कंत्राटदाराने रस्त्याची देखभाल करीत दुरुस्ती करणे आवश्यक असताना ते दूरच राहिले; परंतु नियमबाह्यपणे सर्रास खडी केंद्रातून गौण खनिजाची वाहतूक होत असताना प्रशासन काणाडोळा करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.


गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दाणादाण उडविली असताना या रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी या रस्त्यावरील चिखलात वाहने फसल्यामुळे आहे. त्या ठिकाणी वाहन सोडण्याची वेळ चालकांवर आली  होती. तर या रस्त्यावरून वाहने फसत असल्याने एका नागरिकास उपचार मिळण्यासाठी घेऊन जाताना उशीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. रस्त्याप्रकरणी सारोळा गावकऱ्यांनी वारंवार प्रशासनास कंत्राटदाराने या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी निवेदने दिली. त्यांची  वाहने अडविली; परंतु तेवढ्यापुरते वेळ मारून नेत कंत्राटदारानेसुद्धा याकडे डोळेझाक केली. तर प्रशासनही रस्त्याचा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने नागरिकाचा मृत्यू झाल्याची ओरड नागरिक करू लागले आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com