esakal | परीक्षेला सामोरे जाताना...video
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहीत छायाचित्र

दहावीचे पेपर नेमके कसे सोडवावेत, कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे, उत्तरांची रचना कशी असावी, प्रत्येक विषयाच्या  प्रश्‍नपत्रिका कशा सोडवाव्यात, परीक्षेला कसे सामोरे जावे... यासाठी विषयनिहाय तज्ज्ञ मार्गदर्शन

परीक्षेला सामोरे जाताना...video

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद - पुढील महिन्यात बारावीच्या, तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात दहावीच्या परीक्षेला सुरवात होत आहे. त्यानिमित्त "सकाळ'ने विद्यार्थ्यांना मार्गदर्शनरूपी मदतीचा हात दिला आहे. दहावीचे पेपर नेमके कसे सोडवावेत, कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे, उत्तरांची रचना कशी असावी, प्रत्येक विषयाच्या  प्रश्‍नपत्रिका कशा सोडवाव्यात, परीक्षेला कसे सामोरे जावे... यासाठी विषयनिहाय तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 

परीक्षा हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. या परीक्षेपूर्वी शाळा, खासगी शिकवण्या आणि अभ्यासिकांमधून मिळालेले मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. दहावीची परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मनावर दडपण आणणारी असते; मात्र विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी "सकाळ'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. 

दहावीच्या परीक्षेबद्दल शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, की यंदा दहावीच्या परीक्षेमध्ये अंतर्गत मूल्यमापनाचा समावेश करण्यात आला आहे. यंदा परीक्षेची पद्धती बदलण्यात आली असून प्रश्‍नपत्रिकेऐवजी "कृतिपत्रिका' असणार आहे. विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीला चालना मिळावी, त्याला अभिव्यक्त होता यावे यासाठी कृतिपत्रिकेचे नियोजन करण्यात आले आहे. आता एक प्रश्‍न - एक उत्तर ही पद्धती बंद झाली आहे. आता परीक्षेत जे प्रश्‍न विचारले जाणार आहेत, ते बहुउद्देश, मुक्‍तोत्तरी प्रश्‍न पद्धतीनुसार देण्यात आलेले आहेत. याचा सराव मागच्या वर्षीपासून सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचा पॅटर्न समजून घ्यावा. 

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

परीक्षेची तयारी 
यंदा कॉपीमुक्तीसाठी औरंगाबादची सर्व यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या असून, दक्षता समिती सज्ज झाली आहे. मागच्या वर्षी झालेले गैरप्रकार लक्षात घेता, खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना परीक्षेपासून दूर ठेवण्यात आले आहे. तर जे शासनाचे नियमित कर्मचारी आहेत, अशांचीच केंद्रप्रमुख, केंद्र संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. 

हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही


हे लक्षात ठेवा..

 जे विद्यार्थी नियमित अभ्यास, लेखनाचा सराव करतात, त्यांनी परीक्षेची भीती बाळगू नये. 
 यश-अपयशानेच जीवन अर्थपूर्ण बनते. 
 स्वतःवरचा विश्‍वास ढळू देऊ नका. 
 उगाच कल्पनेत विहार करू नका. 
 या काळात व्हॉट्‌सऍप, फेसबुक, व्हिडिओ गेम्सपासून दूर राहा. 
 मन शांत ठेवा, आनंदी वृत्तीने अभ्यास करा. 
 ठराविक तास पुरेशी विश्रांती घ्या. 
 प्रथम, द्वितीय सत्र, सराव परीक्षांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले असतील तर त्याचा फार विचार करू नका. आपले खरे मूल्यमापन बोर्ड परीक्षेतच होते. 

लक्षात राहण्यासाठी... 

  • - वाचताना मुद्यांची सांगड घाला. 
  • - वारंवार उजळणी करा. मनन, चिंतन करा. 
  • - प्रत्येक घटक, पाठ स्पष्टपणे समजून घ्या. 
  • - वाचताना थोडी विश्रांती घ्या. 
  • - अभ्यासाचे छोटे-छोटे भाग करा; जे वाचले ते आठवून पाहा. 
  • - केलेल्या अभ्यासाचे विश्‍लेषण करा, त्याचे मुद्दे काढा. 
  • - अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा. 
  • - नोट्‌स, सराव प्रश्‍नपत्रिका, पाठ्यपुस्तकांचे टिपण ठेवा. 
  • - जे वाचता त्यातील मुद्दे, घटकांचे निरीक्षण करा. 
  • - विषयांची उजळणी केल्याने दीर्घकाळ स्मृती टिकते.