esakal | एसटी महामंडळाची हिटलरशाही 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कर्मचाऱ्यांना चोर, लबाड गृहीत धरले 
बडतर्फीपर्यंतच्या शिक्षांचा समावेश 

एसटी महामंडळाची हिटलरशाही 

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : एसटी महामंडळात नोकरी करणे ही सहज बाब राहिली नाही. क्षुल्लक चुकीसाठीही तुघलकी पद्धतीची शिक्षा ठरवण्यात आली आहे. कर्मचारी आता चोर, लबाड असल्याचेच गृहीत धरुन शिक्षांचे फर्मान सोडण्यात आले आहे. सुधारित शिस्त व अपिल पद्धती कार्यान्वीत करण्यात आली आहे. या नव्या कार्यपद्धतीने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

एसटी महामंडळात अंत्यत तोकड्या वेतनावर कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. कमीतकमी साधारण पंधरा हजार तर सेवानिवृत्तीपर्यंत (कुठलाही ठपका नसेल तर) साधारण 35 ते 40 हजार रुपयांपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन मिळते. आतापर्यंत महामंडळात कर्मचाऱ्यांना समज देणे, पुर्व इतिहास तपासून शिक्षेत शिथिलता दिली जात होती. जास्तीत जास्त तीन वेतनवाढ रोखण्यापर्यंतची शिक्षा होती. (टोकाच्या प्रकरणात मात्र बडतर्फीचेही अधिकार महामंडळाकडे आहेतच.) आता मात्र यामध्ये महामंडळाने बदल केला असून, "सुधारित शिस्त व अपील कार्यपद्धती' या नावाने 31 डिसेंबर रोजी परिपत्रक जारी केले आहे. जबर वेतनवाढ रोखण्याच्या शिक्षेबरोबरच अपिल कार्यपद्धतीवरही निर्बंध आणले आहेत. 

अरे बाप रे - Video : असा गेला सहा जणांचा जीव, एक दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात

चौकशीची कार्यपद्धती 

घटनेचा अहवाल, घटना घडल्यापासून जास्तीत जास्त तीन कार्यालयीन दिवसात सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करावा. अपवादात्मक परिस्थितीत दहा दिवसाची मुदत दिली आहे. अहवाल प्राप्त झाल्यास जास्तीत जास्त सात दिवसाच्या आत आरोपपत्र द्यावे, अपवाद म्हणून पंधरा दिवसाची मुदत दिली आहे. गैरकृत्यासाठी आरोपपत्रात कोणती कलमे लावावेत हे अधिकार सक्षम प्राधिकाऱ्याकडे असतील. चौकशी अधिकाऱ्याने निलंबनापासून 180 दिवसात चौकशी पुर्ण करावी. निवृत्तीसाठी सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी असेल अशा वेळी कर्मचाऱ्याची चूक झाल्यास चौकशीअंती शिक्षा देवून निवृत्तीपूर्वीच प्रकरण निकाली काढावे. प्रथम व द्वितीय अशा दोन अपिल समित्या काम करतील. 

...तर अपिलही करता येणार नाही 

ज्याच्या विरोधात खात्यामार्फत कार्यवाही करुन शिक्षा देण्यात आली असेल, अशा व्यक्तीला अपिल करता येईल. मात्र ज्याला बडतर्फ केले, सेवेतुन मुक्त केले, पदावनत करणे, खालच्या वेतनावर आणणे, विशिष्ट मुदतीत वेतनवाढ रोखणे, सक्तीची सेवानिवृत्ती यांना दुसरे अपिल करता येणार नाही. 

हृदयद्रावक - आंधळ्या प्रेमाचा असा शेवट : वाचा करुण कहाणी 

काय आहेत शिक्षा? 

0सौजन्याचा अभाव, गैरशिस्तीची लहान सहान कृत्ये, गणवेश न घालणे, कामात हयगय करणे, कामाच्या वेळी रेंगाळत राहणे, वाहकाने मार्गपत्रकाच्या नोंदी न करणे, महामंडळाच्या क्षेत्रात व वाहन चालवताना धूम्रपान करणे यासाठी रुपये दिड हजार पर्यंत शिक्षा आहे. 
0ईटीआय यंत्र चोरीला गेल्यास वेळेत तक्रार न करणे, वाहकाने ड्युटी संपल्यास यंत्र नियोजीत वेळेत जमा न करणे, दिलेल्या सवलतीशिवाय संघटनेसाठी वर्गणी गोळा करणे, चालकाने वाहन चालवताना भ्रमणध्वनी वापरणे यासाठी मुळ वेतन 3 टप्प्याने व सहा महिन्याकरता अल्प परिणामी करणे, किंवा मुळ वेतन तीन टप्प्याने कायमस्वरुपी कमी करणे, तीन वार्षीक

हेही वाचा - धड होते रेल्वेपटरीवर, शिर मात्र गायब!

वेतनवाढ रोखणे. 

0वाजवी कारणाशिवाय वाहकाने तिकीट देण्यात कसूर करणे, विनातिकिट प्रवास करु देणे. पैसे घेऊन तिकीट न देणे, कमी मुल्याची तिकिटे देणे यासाठी मुळ वेतन पाच टप्प्याने कमी करणे अथवा पाच भावी वेतनवाढ रोखणे. 
0चोरी करणे, लबाडी, बेईमानी, अफरातफर करणे, महामंडळाच्या आवारात किंव वाहनात कोणत्याही व्यक्तीवर हल्ला करणे, दंगेखोर व गैरशिस्तीची वागणूक, विघातक कृत्य करणे, चिथावणी देणे अथवा काम बंद करणे, महिलांशी लैंगिक छळवादाचा प्रकार करणे आणि महामंडळाची माहिती प्रसिद्धी माध्यमांना देणे, वरिष्ठांची बदनामी, टिकात्मक लिखाण, भाषण, मुलाखत देणे यासाठी मुळ वेतन पाच टप्प्याने कमी करणे अथवा पाच भावी वेतनवाढी रोखणे.  

 
 

go to top