esakal | औरंगाबाद : दुधडमध्ये एकाच कुटुंबातील सहा तर ब्राह्मणगावात पती-पत्नी बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

Husband & Wife Separated After Testing Positive

फुलंब्री येथील फत्ते मैदानामधील सात कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील ७६ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यापैकी हायरिस्क कॉँटॅक्टमधील १३ जणांचे स्वॅब मंगळवारी (ता. १६) घेण्यात आले आहे. त्यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

औरंगाबाद : दुधडमध्ये एकाच कुटुंबातील सहा तर ब्राह्मणगावात पती-पत्नी बाधित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे. मंगळवारी ब्राह्मणगाव (ता. पैठण) येथील एक दांमत्य तर दुधड (ता. औरंगाबाद) आणि तुर्काबाद खराडी (ता. गंगापूर) येथे प्रत्येकी एकाच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आता दुधड (ता. औरंगाबाद) एकाच कुटुंबातील एकूण सहा व्यक्ती कोरोना बाधित झाल्या आहेत. 
 

ब्राह्मणगाव येथील पती-पत्नी बाधित

आडूळ : आजारी मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या ब्राह्मणगाव (ता. पैठण) येथील पती-पत्नीचा व मुलीच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे मंगळवारी (ता. १६) आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने तत्काळ त्या पती-पत्नीच्या घरातील इतर २३ जणांना होम क्वॉरंटाइन केले, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलकंठ चव्हाण यांनी दिली. 

ब्राह्मणगाव येथील ६५ वर्षीय पुरुष व ६० वर्षीय महिला हे दोघेजण गुरुवारी (ता. ११) औरंगाबाद शहरात राहत असलेल्या आजारी मुलीला भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्या मुलीची कोरोना चाचणी केली असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने तिच्या आई-वडिलांचीही तपासणी केली. यात त्यांच्याही कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याची माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी चव्हाण, सुरेंद्र कुलकर्णी यांच्या पथकाने ब्राह्मणगाव गावाला भेट देऊन २३ जणांच्या हातावर शिक्के मारून त्यांना होम क्वॉरंटाइन केले. 

सुशांतसिंह राजपूत होता तीन दिवस औरंगाबादेत 

याबाबत आरोग्य विभागाला कडक सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता घराबाहेर जाणे टाळावे; तसेच तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा. शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन करावे. 
- चंद्रकांत शेळके, तहसीलदार, पैठण   

तुर्काबादेत आणखी एक रुण 
 

लिंबेजळगाव : तुर्काबाद खराडी (ता. गंगापूर) येथे कोरोना बाधिताच्या पत्नीच्याही कोविड-१९ च्या चाचणीचा अहवाल सोमवारी (ता. १५) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे गावात आता बाधितांची संख्या दोनवर गेली असून, बाधिताच्या आई-वडिलासह सहा जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. 
येथील एका ४० वर्षीय व्यक्तीच्या कोरोना चाचणीचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला होता. सोमवारी या व्यक्तीच्या ३६ वर्षीय पत्नीलाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या कुटुंबातील सहा जणांना क्वारंटाइन करण्यात आले असून, त्यांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहेत, अशी माहिती गंगापूर येथील अधिकारी डॉ. घोडके यांनी सांगितले. 

 अजित पवारांनी, भाजपचा हिशेब केला चुकता

  
परिसरातील शिवराई येथे गुरुवारी एक रुग्ण सापडला होता. आता तुर्काबाद खराडी येथे दोन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, जनता कॅर्फ्यूबाबत विचार सुरू असल्याचे तुर्काबादचे सरपंच ज्ञानेश्वर प्रेमभरे, पोलिस पाटील रामहरी पाटेकर यांनी सांगितले. दोन दिवसांपासून बाधित परिसरात सर्वत्र फवारणी सुरू आहे. पुढील काही दिवस फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 
 

दुधड येथे आणखी एक बाधित 

करमाड : दुधड (ता. औरंगाबाद) येथील कोरोनाबाधित बावीसवर्षीय गरोदर तरुणीच्या ३५ वर्षीय भायाच्या कोरोना चाचणीचा अहवाल मंगळवारी (ता.१६) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आता गावातील एकूण रुग्णसंख्या सहावर पोचली आहे. दरम्यान, मंगळवारी आढळलेल्या बाधिताच्या थेट संपर्कातील सात जणांनाही क्वारंटाइन करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. 

दुधड येथील एका कुटुंबातील बावीसवर्षीय गरोदर तरुणीस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. ही तरुणी शुक्रवारी (ता. १२) नेहमीच्या तपासणीसाठी औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयात गेली होती. यावेळी तिला ताप असल्याने तिची कोरोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

यावरून रविवारी (ता.१४) करमाड येथील ग्रामीण रुग्णालयात या तरुणीच्या कुटुंबातील १३ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. सोमवारी (ता.१५) यातील चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या थेट संपर्कातील सात जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. मंगळवारी तपासणी अहवाल आले असता यात सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर बाधित तरुणीच्या भायाचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या कुटुंबातील एकूण सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता आरोग्य विभागाने कुटुंबातील कोरोना साखळीचे स्वरूप बघता मंगळवारी अहवाल आलेल्या ३५ वर्षीय बाधित तरुणाच्या पत्नीचाही स्वॅब तपासणीसाठी पाठविला. 

फुलंब्रीत घेतले १३ जणांचे स्वॅब, दोघे पॉझिटिव्ह 
 

फुलंब्री : येथील फत्ते मैदानामधील सात कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील ७६ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यापैकी हायरिस्क कॉँटॅक्टमधील १३ जणांचे स्वॅब मंगळवारी (ता. १६) घेण्यात आले आहे. 
प्रशासनाने फत्तेह मैदान परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. या सातजणांच्या संपर्कात आलेल्या १३ जणांचे मंगळवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, जातेगाव आणि ग्रामीण रुग्णालय, फुलंब्री यांनी स्वॅब घेतले असून, ते तपासणीसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत,. त्यापैकी दोघे बाधित आढळले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी प्रसन्ना भाले यांनी दिली.

स्वॅब घेण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद हरबडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय काथार, डॉ. आशा काथार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ नेमिनाथ राठोड, पर्यवेक्षक विजय पाटील, सुनील जाधव, अरुण जगताप, आरोग्यसेविका पुष्पा राजपूत, जयश्री राऊत, सुनीता कुबेर, वाहनचालक जहीर भाई, इरफान भाई, परिचर दाभाडे यांनी प्रयत्न केले. तांत्रिक आणि इतर नियोजन डॉ. रविराज पवार यांनी केले.