
मी कागदावरचा शेतकरी आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनावर विचारलेल्या प्रश्नावर उतर दिले.
औरंगाबाद : मी हाडाचा शेतकरी आहे. आपण पाहिले असेल की गाईचे दुध काढताना, बैल धूतानाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. केंद्रातला मंत्री हे सर्व करु शकतो. याचा अर्थ मी बनावट शेतकरी नाही. मी कागदावरचा शेतकरी आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनावर विचारलेल्या प्रश्नावर उतर दिले. औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता.१५) ते बोलत होते. दिल्ली सीमेवरी सिंघू सीमेवरील शेतकरी आंदोलनात पाकिस्तान व चीनचा हात असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. दानवे म्हणाले, मीच काही कोणीही शेतकऱ्यांची विटंबन करु नये. पण एखाद्या बोलण्याचा विपर्यास बातमीमधून होत असेल तर मी काही करु शकत नाही.
दानवे यांचे वादग्रस्त काय आहे?
कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता. फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथे आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण सोहळा नऊ डिसेंबर रोजी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
संपादन - गणेश पिटेकर