खोकला व ताप असल्याने आयसोलेट झाल्याचे ट्विट करुन मुडेंनी केले बोराळकरांना विजयी करण्याचे आवाहन

ई सकाळ टीम
Tuesday, 1 December 2020

तब्येत बरी नसल्याचे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. आज मंगळवारी (ता.एक) मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होत आहे.

औरंगाबाद : तब्येत बरी नसल्याचे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. आज मंगळवारी (ता.एक) मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होत आहे. या पदवीधर निवडणुकीत भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यातील विविध ठिकाणी सभा घेतल्या होत्या. मराठवाडा पदवीधरसाठी होणाऱ्या निवडणुकीला सुरवात होण्यापूर्वी मुंडे यांनी ट्विट करुन आपण आयसोलेट होत असल्याचे त्यांनी माहिती दिली आहे.

 

पंकजा मुंडे यांचे ट्विट;

पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरिषजी बोराळकर यांना पहिल्या पसंदी चे मत देऊन विजयी करावे .. मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून isolate झाले आहे.अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी..

 

संपादन - गणेश पिटेकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I Am Unwell Pankaja Munde Give Information Through Tweet Aurangabad News