ईएमआयचा ओटीपी सांगाल तर फसाल 

प्रकाश बनकर
बुधवार, 8 एप्रिल 2020

ऑनलाइन व्यवहारासाठी बँक फोन करत नाही 

औरंगाबाद : रिझर्व बँकेने सर्व बँकांना गृह कर्ज व इतर कर्जाचे हफ्ते तीन महिने वाढवून देण्याचे विनंती केली त्यानुसार बँकांत तर्फे ग्राहकांना तीन महिने कर्जाचे हप्ते वाढवून देण्यात येत आहे. याच गोष्टीचा काही लोक गैरफायदा घेत ऑनलाइन फसवणूक करत आहे. यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना आपला ओटीपी कोणालाही सांगू नका,तो सांगितल्यास आपली फसवणूक होऊ शकते असे आव्हान बॅंकातर्फे करण्यात येत आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

ईएमआयचा हप्ता वाढवून देण्यासाठी काही भामटे ग्राहकांना फोन करत ग्राहकाकडून त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपीची मागणी करत आहे. हा ओटीपी सांगितल्यानंतर ग्राहकाच्या खात्यातील पैशावर हे भामटे डल्ला मारतात. असे फसवणुकीचे प्रकार सध्या वाढतच चालले आहे. यामुळे ग्राहकांनी सतर्क राहावे असे आवाहन बँकेतर्फे ग्राहकांना करण्यात येत आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

रिझर्व बँकेच्या विनंतीनुसार प्रत्येक बँक आपल्या गृहकर्ज, वाहनकर्ज व इतर कर्ज विषयी तीन महिन्याची मुदतवाढीचे संदेश(एसएमएस) तसेच फोन करून माहिती देत आहे. हे करताना कोणतीही बँक ग्राहकांना फोन करुन ओटीपी मागत नाही.बँकेच्या नावावर ग्राहकाल फोन करुन ओटीपी विषयी माहीता माघत असेल, तर त्यांना माहीती देऊ नका. याविषयी जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार द्या, असे अवाहनही बँकांत तर्फे करण्यात येत आहे. 

कुठलाही ऑनलाईन व्यवहार करताना बँक ग्राहकाला फोन करून त्याकडे आलेला ओटीपीची मागणी करत नाही. ग्राहकांच्या बँक खात्याशी लिंक असलेला क्रमांकावर ओटीपी पाठवण्यात येतो. हा ओटीपी ग्राहकाच्या खात्यातील गैरप्रकार होऊ नये यासाठीच पाठवण्यात येतो. यामुळे या ओटीपीचा वापर स्वतःसाठी करावा इतर कोणालाही तो सांगू नका. 
- श्रीकांत कारेगांवकर,जिल्हा व्यवस्थापक,अग्रणी बँक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you tell the OTP of EMI, you will get stuck