esakal | Video : खैरेंची सवय गेली नाही : इम्तियाज जलील
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

इम्तियाज जलील याबद्दल बैठकीत काही बोलले नाहीत. पण बाहेर येताच त्यांनी पत्रकारांना बाईट देत खैरेंवर तोंडसुख घेण्याची संधी सोडली नाही.

Video : खैरेंची सवय गेली नाही : इम्तियाज जलील

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील कामांची गुरुवारी (ता.9) आढावा बैठक झाली. मात्र यामध्ये येथे आजी-माजी खासदारात खुर्चीवरुन नाराजीनाट्य झाले. बैठकीत मंत्री, खासदार, आमदार, अधिकारी कुठे बसणार याची नेमप्लेट खुर्चीच्या समोर होती. मात्र माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या खुर्चीवरच ठाण मांडले. 

इम्तियाज जलील याबद्दल बैठकीत काही बोलले नाहीत. पण बाहेर येताच त्यांनी पत्रकारांना बाईट देत खैरेंवर तोंडसुख घेण्याची संधी सोडली नाही. ''आपल्या माजी खासदारांची ठराविक जागेवर बसण्याची सवय गेली नाही. मी खुर्चीच्या मागे पळत नाही. त्यामुळे मला खुर्ची मिळाली नाही, तरी काही वाटत नाही,'' अशी बोचरी टीका केली आहे.

औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी शहरात आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठक सुरु होण्याअगोदर सर्व आमदार, अधिकारी बैठक हॉलमध्ये आले. मात्र जेथे खासदार इम्तियाज जलील यांच्या नावाची पाटी होती त्या खुर्चीवर चंद्रकांत खैरे जाऊन बसले. त्यामुळे पाठीमागून आलेल्या इम्तियाज जलील यांना बैठकीत थोडेसे दूर जाऊन रिकाम्या खुर्चीवर बसावे लागले. 

इम्तियाज जलील म्हणाले की, कोण कुठे बसणार याची नेमप्लेट स्पष्टपणे खुर्चीसमोर होती. मात्र आपले माजी खासदार यांना मागील वीस वर्षापासून एक सवय झालेली आहे. त्यांची ही सवय सुटलेली नाही. ते माझ्या खुर्चीवर जाऊन बसल्याने मला थोड्या लांब जाऊन बसावे लागले. माझ्यासाठी हे महत्वाची नाही, की मी कोणत्या खुर्चीवर जाऊन बसेल. माझ्यासाठी विकासाचे मुद्दे महत्वाचे आहे. मी जे मुद्दे उपस्थित केले. त्यांना मुख्यमंत्र्यांनी स्वीकार केले आहे. 

''प्रोटोकॉलनुसार बसण्याची जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र आपल्या जिल्ह्याचे जे माजी खासदार आहेत चंद्रकांत खैरे त्यांना अजुनही वाटतं तेच खासदार आहेत. त्यामुळे ते तिथे बसले म्हणून मला बाजूला बसावं लागलं, मात्र खुर्ची महत्वाची नाही. जिल्ह्याच्या प्रश्नावर आम्ही चर्चा केली, मात्र त्यांच्या नेत्यांनी मला पुन्हा बोलवून घेऊन शेजारी बसायला सांगितलं,'' असे इम्तियाज जलील बैठकीनंतर म्हणाले 

खुर्ची वादावर चंद्रकांत खैरे म्हणाले 

''बैठकीच्या ठिकाणी खुर्चीचा काही वाद झालाच नाही. ते खासदार पण याबाबत काही बोलले नाहीत. मी जिल्ह्याचा नेता आहे. मी 20 वर्ष खासदार होतो. आता शिवसेनेचा नेता आहे. ती माझीच खुर्ची होती. ते नंतर आले. मला बसण्याचा अधिकार आहे,'' अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली. 

हेही वाचा - 

दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...

धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच!