इम्तियाज जलील म्हणाले, आता हा प्रश्‍न मार्गी लावतोच

दुर्गादास रणनवरे
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

शिष्टमंडळाने शिवाजयीनगर येथे भुयारी मार्ग नसल्याने होणाऱ्या यातनांचा पाढाच जलील यांच्या समोर वाचला. वाहतूकीच्या कोंडीमध्ये जर एखादी रुग्णवाहिका फसली तर रुग्णाला त्वरीत रुग्णालयात घेउन जाणेही मोठे जिकरीचे बनले आहे.

औरंगाबाद : शिवाजीनगर येथील भुयारी मार्गासाठी रेल्वे मंत्र्यांशी बोलुन हा प्रश्‍न मार्गी लागे पर्यंम मी आता स्वस्थ बसणार नाही. अनेक वर्षांपासून येथील लाखो नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. याची मला पूर्ण कल्पना असून भुयारी मार्ग तातडीने व्हावा यासाठी मी पाठपुरावा करतो असे आश्‍वासन खासदार इम्तीयाज जलील यांनी गुरुवारी ता. 13 सातारा देवळाई जनसेवा कृति समितीच्या शिष्टमंडळाला दिले. 

शिष्टमंडळाने शिवाजयीनगर येथे भुयारी मार्ग नसल्याने होणाऱ्या यातनांचा पाढाच जलील यांच्या समोर वाचला. वाहतूकीच्या कोंडीमध्ये जर एखादी रुग्णवाहिका फसली तर रुग्णाला त्वरीत रुग्णालयात घेउन जाणेही मोठे जिकरीचे बनले आहे.

राज ठाकरे अडकले आणि काय झाले...

ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, स्कूल बसेस तसेच सरकारी व खासगी कंपन्यातील लाखांवर कामगारांना शिवाजीनगर येथील एकमेव मार्गाचाच पर्याय आहे. परंतू दर अर्ध्या तासांनी रेल्वे गेट बंद होत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात व तासन तास वाहतूकीचा खोळंबा होत असल्याचेही यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान शिष्टमंडळाने जलील यांच्या निदर्शनास आणुन दिले.

क्लिप झाली व्हायरल पण अमोल सापडेना

यापूर्वी देखील समितीने आपणांस प्रत्यक्ष भेटुन निवेदने दिली, परंतू अद्यापही आपण आमच्या या ज्वलंत प्रश्‍नाकडे लक्ष न दिल्याने आता आम्हाला रेल्वे रोको किंवा आमरण उपोषण केल्या शिवाय पर्यायच नसल्याची हतबलता शिष्टमंडळाने व्यक्‍त केली. परंतू जलील यांनी मला थोडा वेळ द्या, मी हा प्रश्‍न मार्गी लावल्यशिवाय शांत बसणार नाही, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिल्याचे बद्रिनाथ थोरात यांनी सांगितले.

यावेळी जलील यांना समितीतर्फे निवेदनही देण्यात आले. शिष्टमंडळात बद्रीनाथ थोरात, असद पटेल, रामदास मनगटे, दिलीप निकम, एस. डी. कुलकर्णी, संजय त्रिभुवन, निवृत्त पोलीस कर्मचारी श्री.कुलकर्णी साहेब, ऍड. कडू पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imtiyaz Jaleel Will Solve Shivajinagar Underpass Issue Aurangabad News