esakal | ब्रेकिंग न्यूज : राज ठाकरे अडकले ट्राफिक जाममध्ये, आणि मग रुग्णवाहिका
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

राज ठाकरे यांचा वाहनांचा ताफा याठिकाणी येताच एकच जल्लोष झाला. ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. परंतु, अतिशय रहदारीच्या या चौकात वाहतूक कोंडी झाली. तब्बल अर्धा तास हा गोंधळ सुरू होता.

ब्रेकिंग न्यूज : राज ठाकरे अडकले ट्राफिक जाममध्ये, आणि मग रुग्णवाहिका

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीची पूर्वतयारी आणि चाचपणीच्या दृष्टीने औरंगाबादच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे शहरात येताच ट्राफिक जाममध्ये अडकले. त्यांच्या पाठोपाठ रुग्णवाहिकाही या गर्दीत अडकली. अखेर मोठ्या गोंधळानंतर त्यांचा ताफा पुढे धकला. पण हा जाम झाला होता त्यांच्याच कार्यकर्त्यांमुळे. 

राज ठाकरे यांचा तीनदिवसीय औरंगाबाद दौरा गुरुवारपासून (ता. १३) सुरू झाला आहे. या दौऱ्याच्या नियोजनासाठी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील कालच शहरात आले होते. पाच रंगांचा मनसेचा झेंडा आता भगवा झाला, त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रादेखील आली. या नव्या भूमिकेमुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंदुत्ववादाचे वारे वाहू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा मुद्दाही चर्चेला आला आहे. 

असा झाला ट्राफिक जाम

राज ठाकरे संध्याकाळी सहाच्या सुमारास औरंगाबादमध्ये दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी कर्णपुऱ्याच्या मैदानात जमावे, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार कार्यकर्ते जमले खरे, पण काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी बाबा पेट्रोलपंपाच्या महावीर चौकातच गर्दी केली. एकापाठोपाठ सगळेच महावीर चौकाच्या उड्डाणपुलाखाली जमले. 

व्हायरल क्लिपमधला अमोल कोण...

राज ठाकरे यांचा वाहनांचा ताफा याठिकाणी येताच एकच जल्लोष झाला. ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. परंतु, अतिशय रहदारीच्या या चौकात वाहतूक कोंडी झाली. तब्बल अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. यात रुग्णवाहिकाही अडकली. शेवटी हळूहळू ताफा पुढे सरकला आणि कोंडी फुुटली.

अशी निघाली मिरवणूक

याच ठिकाणाहून राज ठाकरे यांच्या ताफ्याच्या पुढेमागे दुचाकी आणि चारचाकी वाहनफेरी सुरू झाली आहे. ही फेरी क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरामार्गे सुभेदारी विश्रामगृहाकडून टीव्ही सेंटरपर्यंत जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मी राजकारण करायला आलो नाही

शुक्रवारी (ता.14) पक्षांतर्गत बैठकांचे आयोजन, मनपा निवडणुकीसंदर्भात पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांबाबत चर्चा होईल. शनिवारी (ता.15) वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच इतर संस्थांच्या कार्यक्रमासाठी वेळ राखीव आहे. 

go to top