esakal | औरंगाबादच्या नागद घाटात जाफराबाद-मालेगाव एसटी बसचे ब्रेक फेल, नशीब बलवत्तर म्हणून १६ प्रवासी बचावले
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Nagad Ghat Bus Accident

या घाटातील रस्त्यावर मोठ- मोठाली खड्डे पडले असून वाहन चालवणे म्हणजे घाटात कसरत करावी लागते. जिथे वळण आहे तिथेच खड्डे जास्त पडली आहेत.

औरंगाबादच्या नागद घाटात जाफराबाद-मालेगाव एसटी बसचे ब्रेक फेल, नशीब बलवत्तर म्हणून १६ प्रवासी बचावले

sakal_logo
By
मनोज पाटील

नागद (जि.औरंगाबाद) : नागद (ता.कन्नड) घाटात रविवारी ( ता.२१)  जाफराबाद-मालेगाव  एसटी बसचा संध्याकाळी सात वाजता घाटातील खालून दुसऱ्या होडीवरील वळणावर अचानक ब्रेक फेल झाल्याने बस दरीत जाता जाता वाचली. बसचा अर्धा हिस्सा दरीकडे असून अर्धा बस वरती आहे. नागद पोलिस चौकीचे जमादार पंढरीनाथ इंगळे, पोलिस सुशीलकुमार बागुल हे घाटात गस्तीवर असताना ही  बस दरीत पडते की काय असे त्यांना वाटले.

वाचा - अवघ्या चार दिवसांत पावणेसहाशे रुग्ण! कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची झपाट्याने वाढ

ते त्वरित घटनास्थळी आले सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. या बसमध्ये १६ प्रवासी होते. या बस (एमएच १४ बीटी  ४००३)  मधील प्रवासी सर्व सुखरूप आहेत. कोणीही जखमी नाही. एसटी बसचा चालक राजा महादू तोळेकर व वाहक सुनील खेडेकर हे होते. चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्याच्यावर सायगव्हाण येथे प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.

वाचा - कोरोना लस घेतल्यानंतर पुन्हा होऊ शकतो कोरोना? काय आहे वास्तव, जाणून घ्या

नशीब बलवत्तर म्हणून प्रवासींसह चालक  व वाहक  वाचले. जमादार आणि पोलिस या प्रवाशांना देव भेटला असे वाटत होते. जेसीपी आणून ही बस वरती काढावी लागेल. या घाटातील रस्त्यावर मोठ- मोठाली खड्डे पडले असून वाहन चालवणे म्हणजे घाटात कसरत करावी लागते. जिथे वळण आहे तिथेच खड्डे जास्त पडली आहेत. बसमुळे या घाटातील वाहतूक बंद पडली आहे.

संपादन - गणेश पिटेकर