Breaking News : जायकवाडीने केली 'साठी' पार

गजानन आवारे 
Saturday, 15 August 2020

जायकवाडी धरणात १९ हजार ९५२ क्युसेकने पाणी दाखल होत असल्याने मराठवाड्यासाठी ही एक आनंदाची बाब आहे.

पैठण (औरंगाबाद) : जायकवाडी धरण परीसरात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून धरणाच्या पाण्याची टक्केवारी ६०.४१ झाली. अशी माहिती अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली. वाढत्या पाणी पातळीमुळे जायकवाडीने 'साठी' गाठली असून औरंगाबाद शहरासह, शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

धरणात १९ हजार ९५२ क्युसेकने पाणी दाखल होत असल्याने मराठवाड्यासाठी ही एक आनंदाची बाब आहे. धरण क्षेत्रात एक जून पासून ते १५ ऑगस्ट पर्यत ५६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षी याच दिवशी १५४ मिली मीटर पावसाची नोंद झाली होती.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा 

सध्या जायकवाडी धरणात नांदूर मधमेश्वर बंधा-यातून १९ हजार ९५२ क्युसेक वेगाने पाणी दाखल होत आहे. जायकवाडी धरणाची सकाळी सहा वाजता पाणी पातळी १५१३.९३ फुटामध्ये तर  ४६१.४४६ मीटर मध्ये असून पाण्याची आवक १९९५२ क्युसेक येत असून धरणाचा एकूण पाणी साठा २०४९.७३९ दलघमी असून जिवंत पाणी साठा १३११.६३३  दलघमी आहे. तर धरणाच्या पाण्याची टक्केवारी ६०.४१ इतकी आहे. सध्या उजवा व डावा कालव्यासह पैठण जलविद्युत केंद्र बंद आहे.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

यांचे आहे लक्ष 
नियंत्रण कक्षात अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे, सहाय्यक अभियंता संदीप राठोड, गणेश खराडकर, राजाराम गायकवाड यांची उपस्थिती असून धरणातील पाणी मोजमाप, आवक या बाबत ते सातत्याने लक्ष ठेवून आहेत.  

ज्ञानेश्वर उद्यानात भुकंप मापन यंत्र बसवा 
नाथसागरावर अनुभवी शासकीय व निमशासकीय जलतज्ञ, यांत्रिकी, जलतरण पटू व बोट सज्ज पथक पूर्ण वेळ ठेवावे. तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे ज्ञानेश्वर उद्यानात तात्काळ भुकंप मापन यंत्र बसवावे अशी मागणी प्रतिसाद संघटनेने केली आहे. 

 

मराठवाड्याची जिवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणामध्ये सलग दुसऱ्या वर्षी १५ ऑगस्टला ६० टक्क्याच्यावर पाणीसाठा झाला आहे. अध्याप वरील भागांमध्ये चांगला पाऊस अपेक्षित असल्यामुळे यावर्षी धरण शंभर टक्के भरू शकते. त्याच प्रमाणे गोदावरी नदीवरील जवळपास सर्वच उच्च पातळी बंधा-यामध्ये चांगला पाणीसाठा झाल्यामुळे अनेक वेळा बंधा-याचे दरवाजे उघडावी लागली आहेत सिंचनासह, विजनिर्मिती, उद्योग व मत्स्यो उत्पादनास चांगला वाव आहे. 
इंजि. राजेंद्र काळे अधीक्षक अभियंता, कडा

संपादन-प्रताप अवचार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayakwadi dam water leval