वकीलाला मिळाली जेलची हवा....बॅंकेला ४२ लाखांचा....

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 July 2020

बनावट सोने गहाण ठेवून व्हॅल्युअरच्या मदतीने टाऊन सेंटर येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या शाखेला ४२ लाख ६३ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणातील मुख्य आरोपी वकीलाची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी दिले. गंगाधर नाथराव मुंढे (४०, ज्योती नगर) असे त्या आरोपी वकीलाचे नाव आहे. आरोपीला हर्सूल कारागृहात हलविण्यात आले. 

औरंगाबाद: बनावट सोने गहाण ठेवून व्हॅल्युअरच्या मदतीने टाऊन सेंटर येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या शाखेला ४२ लाख ६३ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणातील मुख्य आरोपी वकीलाची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी दिले. गंगाधर नाथराव मुंढे (४०, ज्योती नगर) असे त्या आरोपी वकीलाचे नाव आहे. आरोपीला हर्सूल कारागृहात हलविण्यात आले. 

हेही वाचा- आमदार कुचे यांच्यासह भाऊ, युवतीविरोधात गुन्हा दाखल, युवतीकरवी भाच्यालाच पाठविले अश्लिल संदेश 

प्रकरणात महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या टाऊन सेंटर सिडको येथील शाखेचे अधिकारी अच्युत दत्तराव दुधाटे यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, वकील गंगाधर मुंढे व मंगेश नाथराव मुंढे या दोघांनी गोल्ड व्हॅल्युअर रमेश उदावंत याच्या साहाय्याने बनावट सोने बॅंकेत ठेवून ४२ लाख ६३ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.

क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपी वकील गंगाधर मुंढे याला न्यायालयात हजर करण्यात आले असता आरापी गंगाधर मुंढे हा गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असून त्याने त्याच्या हस्ताक्षराचा तपास करणे आहे. आरोपीचा भाऊ मंगेश मुंढे पसार असून त्याला देखील अटक करणे आहे.

आरोपी गंगाधर विरोधात क्रांती चौक, हर्सूल, वेदांतनगर, जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. प्रकरणात महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेतर्फे ॲड. रोहन अशोकराव नवले यांनी काम पाहिले. 

क्लिक करा- ...अन्यथा विभागीय कृषी सहसंचालकांना अटक करुन उच्च न्यायालय खंडपीठात हजर करा 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Judicial Custody to Accused Advocate Aurangabad News