तरुणीची ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या

राजेंद्र भोसले 
Thursday, 31 December 2020

आत्महत्या करण्यापूर्वी तिने उजव्या हातावर ब्लेडने वार केले असून व भिंतीवर रक्ताने सही केल्याचे आढळून आले

कन्नड (जि. औरंगाबाद) : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने शारीरिक, मानसिक छळ केल्याने तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता.२९) रोजी घडली. याप्रकरणी कन्नड शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामा वाघूळे (रा.अंधानेर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार कन्नड शहरातील सिध्दार्थ कॉलनीतील रहिवासी अंजली हिला आरोपीने लग्नाचे आमिष दाखविले होते. मात्र, तो तिच्याशी लग्न करत नव्हता. लग्नाचा विषय काढल्यास तो तिचा शारीरिक व मानसिक छळ करत असे. या छळास कंटाळून तरुणीने शहरातील एका हॉटेल मध्ये छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Look Back 2020: नव्या वर्षाने तरी भराव्या जखमा मनातल्या...

आत्महत्या करण्यापूर्वी तिने उजव्या हातावर ब्लेडने वार केले असून व भिंतीवर रक्ताने सही केल्याचे आढळून आले. दरम्यान, हॉटेल मॅनेजर प्रकाश सोनवणे यांनी या घटनेची माहिती शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, रात्री उशिरा मृत युवतीची काकू ज्योती केदार (रा. शेंद्राबन, औरंगाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी रामा वाघूळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस ताब्यात घेतल्याशिवाय तरुणीचे पार्थिव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने काही वेळ तणाव झाला होता. यानंतर कन्नड शहर पोलीस आरोपीचा तपास करून आरोपीस वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथून अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस अधीक्षक भामरे हे करीत आहेत.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kannad aurangabad Young woman commits suicide