भाजप शहराध्यक्षपदी केणेकर, जिल्हाध्यक्षपदी विजय औताडे

 Kenekar to be BJP city president, Vijay Ataade as District President
Kenekar to be BJP city president, Vijay Ataade as District President

औरंगाबाद : भाजपच्या शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष निवडीला अखेर सोमवारी (ता. 27) मर्हूत लागला. शहराध्यक्षपदी संजय केणेकर तर जिल्हाध्यक्षपदी विजय औताडे यांची सर्वानुमते निवड झाली. 

तापडिया नाट्यमंदिरात रात्री ही निवड प्रक्रिया पार पडली. यात शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांना नावे देण्याच्या सूचना निवडणूक अधिकारी आमदार सुजितसिंग ठाकूर यांनी केल्या.

शहर,जिल्हाध्यक्ष 12 पदाधिकाऱ्यांनी दिले नाव 

शहराध्यक्षपदासाठी दिलीप थोरात, प्रशांत देसरडा, राजू शिंदे, शिवाजी दांडगे, केणेकर आणि अनिल मकरिये यांची तर जिल्हाध्यक्षपदासाठी किशोर धनायत, लक्ष्मण आवटे, औताडे, सुरेश बनकर, अशोक पवार आणि संजय खंबायते अशी शहराध्यक्षपदासाठी सहा तर जिल्हाध्यक्षपदासाठी सहा असे एकूण 12 पदाधिकाऱ्यांनी आपले नावे दिली होती. नंतर इच्छुकांच्या निवडणूक अधिकारी ठाकूर, संघटनमंत्री भाऊराव देशमुख, डॉ. भागवत कराड यांनी मुलाखती घेतल्या. सायंकाळी सहापासून सुरू झालेली निवड प्रक्रिया रात्री नऊ वाजता आमदार ठाकूर यांनी शहराध्यक्षपदी केणेकर तर जिल्हाध्यक्षपदासाठी औताडे यांच्या नावाची घोषणा केली. 


हरिभाऊ बागडे, किशनचंद तनवाणी नाराज? 
अनेक दिवसांपासून लांबणीवर असलेली शहर, जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, शिरीष बोराळकर, मावळते जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, भगवान घडामोडे, ज्ञानोबा मुंडे, डॉ. भागवत कराड, कचरू घोडेके, अनिल मकरिये यांची प्रमुख उपस्थिती होती; मात्र शहरात असूनही आमदार हरिभाऊ बागडे, मावळते शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी या महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित नव्हते. याची चर्चाही सभागृहात झाली.या विषयी केंद्रीय राज्यमंत्री दानवे, सावे, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार बागडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली; मात्र बागडे का उपस्थित नव्हते, हे कळू शकले नाही. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहराध्यक्षपदी पुन्हा तनवाणी यांना संधी मिळेल अशी चर्चा होती; मात्र प्रत्यक्षात त्यांना संधी मिळणार नसल्याची कुणकुण लागल्याने तनवाणी आणि त्यांच्या समर्थकांनी संघटन बैठकीकडे पाठ फिरवल्याची चर्चा या बैठकीत कार्यकर्ते करीत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com