कोणत्या जिल्ह्यात होणार सेरो सर्वेक्षण वाचा सविस्तर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र


औरंगाबाद  : जिल्ह्यात कोरोनामुळे झालेला प्रादुर्भाव लक्षात यावा व त्यादृष्टीने उपाययोजना करण्यास प्रशासनाला मदत व्हावी यासाठी केंद्रीय पथकाच्या शिफारसीनुसार जिल्ह्यात ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात "सेरो सर्वेक्षण" करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी व मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी आज केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोविड-१९ आजाराच्या अनुषंगाने सेरो सर्वेक्षणाबाबत बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जनऔषध व वैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. जगन्नाथ दिक्षित, सुक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती बजाज, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, एमजीएमच्या डॉ. शोभा साळवे आदींची उपस्थिती होती. 

कोरोना विषाणूनंतर शरिरात विकसित होत असलेल्या एलजीएम, आयजीएम, अँटीबॉडीज तपासण्यासाठी सर्वेक्षण करुन निवडक चाचण्या करण्यात येणार आहेत. या चाचण्यांची तपासणी घाटीतील प्रयोगशाळेत करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया दिल्लीच्या धर्तीवर राबविण्यात येणार आहे. या तपासणीसाठी जिल्‍ह्याची वाळूज-बजाज महानगर, महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण असे ३ विभागात विभागणी करण्यात आली आहे. या तपासणीसाठी रँडम सॅम्पलिंग पद्धतीने घटकांची निवड करण्यात येऊन वैज्ञानिक पद्धतीने तपासणीसह अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी घाटीच्या इन्स्ट्यिूशनल इथिक्स कमिटीच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी लागणारे सॅम्पल जिल्हा परिषद, महानगरपालिका एकत्रित करुन प्रयोगशाळेस तपासणीसाठी पाठवणार आहे. 



मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात सेरो सर्वेक्षण 

जिल्ह्यात कोरोनामुळे झालेला प्रादुर्भाव लक्षात येण्यास मदत होईल.यापूर्वीच अशा पद्धतीचे सर्वेक्षण मराठवाड्यातील परभणी, बीड आणि नांदेड या जिल्ह्यात झालेले आहे, असेही श्री. चौधरी म्हणाले. तर मनपा आयुक्त श्री. पांडेय सर्व घटकांची रँडमाईज पद्धतीने तपासणी करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगितले. 
डॉ. दिक्षीत, डॉ. मुजिब, डॉ. बजाज, डॉ. गंडाळ, डॉ. साळवे यांनीही सर्वेक्षणात आवश्यक असणाऱ्या बाबींबाबत सविस्तर माहिती दिली.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com